एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात सापडली 1689 ब्रिटीशकालीन नाणी

coin

औरंगाबाद – सिडको भागातील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करताना काल सायंकाळी तब्बल 1689 ब्रिटीशकालीन नाणी सापडली. ही नाणी तब्बल दोन किलो वजनाची आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. एमजीएमसमोरील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन विकसित करण्याचा निर्णय … Read more

जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायत तर 16 नगरपंचायतच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 47 तर नगरपंचायतीच्या तीन आणि सोयगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 13 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या 178 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. … Read more

मटणाची भाजी का नाही केली ? म्हणत दारुड्या पतीचा पत्नीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – मजुरी करणाऱ्या पत्नीने मटण ऐवजी जेवणात पिठले केले म्हणून दारुड्या पतीने तिला काठीने बेदम मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबता रक्तबंबाळ अवस्थेतील पत्नीला त्याने फासावर लटकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथे शुक्रवारी रात्री घडली. गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेने स्वतःची कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत शेजारी आश्रय घेतल्याने जीव वाचला. विवाहितेवर … Read more

नागरिकांचे लसीकरण लवकर करा, अन्यथा…

औरंगाबाद – जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड तालुक्यातील लसीकरण सर्वात कमी असल्याचे सांगत उपहासात्मक अभिनंदन करून येत्या आठ दिवसांत उर्वरित सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा कारवाईला तयार रहा, असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्याचे आदेश त्यांनी … Read more

जिल्ह्यात विविध मार्गांवर बससेच्या 220 फेऱ्या

औरंगाबाद – मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून, यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. परंतु काही कर्मचारी कामावर परत असल्याने एसटी महामंडळाने काही प्रमाणात बस सेवा सुरू केली आहे. काल दिवसभरात एसटी महामंडळाने विविध मार्गांवर 47 बसेस सोडल्या. या बसेसने 220 फिरा केल्या असून यातून 3300 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. पुणे मार्गावर … Read more

परदेशातून आलेला औरंगाबादचा रहिवासी मुंबईत ओमायक्राॅनने बाधित

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून धडकी भरविणाऱ्या ओमायक्राॅनची परदेशातून प्रवास करून आलेल्या शहरातील एका नागरिकास बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हा रुग्ण समोर आला. सध्या हा रुग्ण मुंबईतच विलगीकरणात आहे. राज्यात रविवारी सहा नव्या ओमायक्राॅनबाधित रुग्णांची भर पडली. यात औरंगाबादेतील एका रुग्णाचा समावेश आहे. सदर रुग्ण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात … Read more

शहरातील 746 शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा शहरात आज पासून सुरू होणार आहेत. शहरात शासकीय आणि खासगी अशा 746 शाळांची घंटा वाजणार आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा एकदा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशानुसार शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून … Read more

20 लाख रुपयांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा छळ; हाॅस्पिटल बांधून देण्यासाठी माहेरच्यांवर दबाव

doctor

औरंगाबाद : जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं ‘रुग्णालय बांधण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पैशांसाठी आरोपी पतीसह सासू, सासरे आणि दीर यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं फिर्यादीत केला आहे. … Read more

शेंद्रा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक ग्रॅन्युअल्स युनिटला भीषण आग

fire

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडीसीतील एका प्लास्टिक दाणे (ग्रॅन्युअल्स) बनविणार्‍या युनिटला काल रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्धातासात ही आग संपूर्णतः आटोक्यात आणली. दरम्यान, तोपर्यंत कच्चा व तयार माल आणि मशिनरी जळुन सुमारे दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सेक्टर डी मधील … Read more

गॉगलच्या फ्रेन्चायजीची तब्बल 93 लाखांची फसवणूक; एकाला अटक

Cyber Froud

औरंगाबाद – लेन्‍सकार्ट कंपनीच्‍या स्‍टोअरमधून ग्राहकांनी खेरदी केलेल्या साहित्याचे पैसे कंपनीच्‍या खात्‍यावर जमा न करता क्यूआर कोडव्‍दारे परस्पर वळवण्यात आले. एजन्सीला तब्बल 93 लाख 144 रुपयांचा चुना लावणाऱ्या दोघांपैकी एकाला सायबर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दामोधर वामन गवई (वय 35, रा. लक्ष्‍मी कॉलनी, मुळ रा. पेठ ता. चिखली जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. … Read more