शहरात गुन्हेगारांचे हौसले बुलंद ! गुन्हेगाराने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली कार

Crime D

औरंगाबाद – शहरातील शिवाजीनगर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराने एका महिलेसह पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर वाहन घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद (वय ३२, रा. विजयनगर चौक, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. एकंदरीतच या घटनेमुळे जर शहरात जनतेचे रक्षण करणारेच असुरक्षित असतील … Read more

हत्या की आत्महत्या ? आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह !

Crime D

औरंगाबादक – आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कामगाराचा मृतदेह खदानीत लटकत्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष विठ्ठल वाघमारे (३२) राहणार वाळूज असे मयताचे नाव आहे. गुरुवारी एका खदानीतील झाडाला लटकत्या अवस्थेत सापडल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील तिसगावच्या खदानीतील झाडाला या कामगाराचा मृतदेह गळफास घेतलेल्या … Read more

दरोडेखोरांचा महामार्गावर फिल्मी स्टाईल थरार ! बँकेच्या चेअरमनवर हल्ला करून पळवलेल्या इनोव्हाने एकाला चिरडले

daroda

औरंगाबाद – धुळे-सोलापूर महामार्गावर तीन दरोडेखोरानी शुक्रवारी मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. रायपूर डोंनगाव येथून एक क्विड चारचाकी थांबवून तिघे ती घेऊन पळाले व तीच चोरीची कार बँकेच्या चेअरमनच्या धावत्या इनोव्हा समोर लावून बेदम मारहाण करीत ती घेऊन पळाले. दरम्यान दरोडेखोरांचा वाहनांचा जांभळा जवळ भीषण अपघात झाला. या मध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर तिघे … Read more

संतपीठ ते सौरऊर्जा…; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक … Read more

विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखास तात्काळ सेवामूक्त करा

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखाला तात्काळ सेवामुक्त करून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डावात मचाळा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे एक निवेदन पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष नवनीत तापडिया यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना आज दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, … Read more

नागरिकांच्या तक्रारींचे न्यायपूर्ण निरसन होणार – डॉ. निखिल गुप्ता

nikhil gupta

औरंगाबाद – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील नागरिकांना पोलीसांबद्दल काही तक्रार असल्यास औरंगाबादेत तक्रार नोंद करता येणार असून कायद्याप्रमाणे तक्रारींचे न्यायपूर्ण निरसन करण्यात येणार आहे. तक्रारी, समस्यांचा तत्काळ निपटारा झाल्याने पोलीस, नागरिक यांना न्याय व सुविधा मिळणे सुलभ होणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उद्‍घाटन … Read more

औरंगाबादेत कायद्याचा धाक संपला ? 18 वर्षीय तरुणाचे डोके ठेचून ‘मर्डर’

Murder

औरंगाबाद – शहरातील कांचनवाडी भागात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या हत्येमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था धाब्यावर असल्याचे उघडकीस आले आहे. वारंवार होणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश दिगंबर काकडे (१८, रा. नक्षत्रवाडी) या युवकाचा धारधार शस्त्राने खुन करण्यात आल्याची घटना … Read more

जिल्हा परिषद इमारत भूमीपूजनासाठी वॉटरप्रूफ मंडप

औरंगाबाद – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, वीस हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपात एक हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था आणि 20 बाय 50 फुटांचे भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. … Read more

शेतकऱ्यांनी चिंता करू नये; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली भाडेकरूने घरमालकाला गंडवले

Online Class

औरंगाबाद – शहरातील सातारा परिसरातील एका भाडेकरूने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगलाच फायदा करून देतो, असा भूलथापा मारत घरमालकाला तब्बल 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आधी ऑनलाइन शॉपिंगचे व्यवहार करून देण्यासाठी घरमालकांचा मोबाइल वारंवार वापरल्यानंतर काही दिवसातच भाडेकरून घरमालकांची बँकेची माहिती मिळवून परस्पर त्यांच्या नावे कर्जही घेऊन टाकले. कर्जाची रक्कम नंतर स्वतःच्या खात्यात … Read more