अतिवृष्टीचा तडाखा ! जिल्हा परिषदेच्या 245 कोटीच्या मालमत्तेचे नुकसान

औरंगाबाद – जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठ्याच्या योजना, रस्ते, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाच्या इमारतींना बसला आहे. या पावसामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती जी.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली आहे. अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील साई गव्हाण, नागद, देभेगाव … Read more

धुवाधार पावसामुळे हर्सूल तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

harsul

औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात सुरु असलेल्या धो-धो पावसामुळे जुन्या शहराची तहान भागवणारा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिक आनंदी झाले आहेत. मात्र प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण तलाव बघण्यासाठी व मासे पकडण्यासाठी हौशी बांधवांची मोठी गर्दी होत आहे. https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/582334429478075/ संपूर्ण जुन्या शहराला हर्सूल तलावातून … Read more

विवाहित तरुणाकडूनच लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Rape

औरंगाबाद – शहरात दिवसागणिक महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. यामुळे शहरात महिला कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता एका विवाहित तरुणानेच लग्नाचे अमिश दाखवून मुंबईतील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहित तरुणाने मुंबईतील एका परिचारिकेवर सतत तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला. तसेच स्वतःचे लग्न झाल्याची बाब तिच्यापासून त्याने लपवून … Read more

 धक्कादायक ! चिमुकल्यांना दीड लाखांत विकत घेऊन मागायला लावले भीक; मायलेकी गजाआड

begging

औरंगाबाद – चिमुकल्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून तब्बल दीड लाख रुपयात विकत घेऊन त्यांना मारहाण करत भीक मागवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मायलेकी ला मुकुंदवाडी पोलिसांनी काल अटक केली जनाबाई उत्तम जाधव (59) आणि सविता संतोष पगारे(33, दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या प्रकरणामुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील … Read more

बहुप्रतीक्षित शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी 16.52 कोटी; रेल्वे विभागाचे खंडपीठात शपथपत्र

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शहरातील बहुप्रतिक्षित शिवाजीनगर येथील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी रेल्वेने 16 कोटी 52 लाख रुपये मंजूर केले आहेत. असे शपथपत्र रेल्वे खात्याच्या वतीने ॲड. मनीषा नावंदर यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केले. त्यामुळे त्यापासून प्रतीक्षेत असलेला हा मार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक … Read more

‘त्या’ घोटाळ्यातील मास्टर माईंड चा शोध सुरू

औरंगाबाद – शहरातील पहाडसिंगपुरा भागातील डीकेएमएम महाविद्यालयातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 नागरिकांना बोगस लस प्रमाणपत्र दिल्याचे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील मास्टरमाइंड व्यक्तीचा आता पोलीस तसेच मनपाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप लाभार्थ्यांना हात लावलेला नाही. गरज पडली तर लाभार्थ्यांना ही विचारावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीकेएमएम … Read more

औरंगाबाद – धुळे महामार्ग ठप्प; कन्नड घाटात कोसळली दरड

darad

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे. औरंगाबादला जाण्यासाठी कन्नड घाट हा जवळचा … Read more

औरंगाबादेत पाझर तलाव फुटला; नागद परिसरात भीषण पूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा वरुणराजाचे आगमन झाले असून जोरदार पाऊस पडत आहे. औरंगाबाद मध्ये देखील धुव्वाधार पाऊस पडत असून भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार समोर आला. पूर आल्यामुळे मंदिराचा … Read more

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅक पुनर्मूल्यांकनात ‘अ’ दर्जा प्राप्त

devgiri clg

औरंगाबाद : देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयास नॅक पुनमूल्यांकनात ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (नॅक) समितीने ५ व ६ ऑगस्टदरम्यान भेट देत पाहणी केली होती. या पाहणीनंतर नॅकने नुकताच निकाल … Read more

खळबळजनक ! वेबसाईट हॅक करून लस न घेताच प्रमाणपत्र मिळविणासाठी तब्बल 16 नावे

moderna vaccine

औरंगाबाद : लस न घेताच प्रमाणपत्र घेण्याचा काहीजणांचा प्रयत्न असतो. लस न घेताच एकाच कुटुंबातील 16 जणांची नावे वेबसाईटमध्ये आढळून आली. डी के एम एम लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला. डाटा ऑपरेटर च्या सतर्कतेमुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मनपाने चौकशी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याची … Read more