‘शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या! नाहीतर….’; बच्चू कडूंचा केंद्राला कडक इशारा

मुंबई । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि … Read more

फक्त ‘एवढं’ करा! मी भाजपमध्ये जाण्यास तयार; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

अहमदनगर । केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी … Read more

‘शेतकऱ्यांचा कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा!’; बच्चू कडू कडाडले

अमरावती । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर कांद्याचे भाव वधारले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर … Read more

शेतकरी विरोधानंतर केंद्राची कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

अकोला । मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश काढला होता. केंद्राच्या या निर्णयाला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला भाजपमध्येही विरोध वाढताना दिसतोय. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी … Read more

पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता … Read more

देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. राज्यसरकारने … Read more