रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्ताला पाहून बच्चू कडूंनी थांबवली गाडी आणि…

अमरावती प्रतिनिधी | आपल्या हटके स्टाईलने चर्चेत राहणारे बच्चू कडू नेहमीच आपल्या कार्यामुळे प्रकाशझोतात येतात. सातत्याने आगळ्या वेगळ्या आंदोलनातून चर्चेत राहणारे बच्चू कडू यांची ओळख रुग्णसेवक म्हणूनही आहे. नुकतेच एका रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्ताला पाहून बच्चू कडू यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. एवढेच नाही तर स्वताच्या गाडीत त्या अपघात ग्रस्तांना आणून रुग्णालयात दाखलही केले. या घटनेचा … Read more

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याचे ‘या’ मंत्र्यांनी दिले संकेत..

अमरावती । यंदाचं शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. सद्यस्थिती पाहता शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झालं पाहिजे, सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर … Read more

शिक्षण संस्थांनी पालकांना पूर्ण फीसाठी सक्ती केल्यास गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

अमरावती । गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या तक्रारींची दखल घेताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी … Read more

भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. … Read more

बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे. #अकोला | आमदार … Read more

अचलपुरात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण; अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७९ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालूक्यातील ४२ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्ती परसापूर या गावातील रहिवासी असून शनिवारी त्याचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झालेला होता. आज त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी … Read more

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more

राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास कामासाठी सुद्धा २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील राम शेवाळकर यांच्या वाडा तसेच परतवाड्यातील प्रबोधनकार ठाकरे … Read more

सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे! संपूर्ण कर्जमाफीचे बच्चू कडूंनी केलं सूतोवाच

”सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे” असं सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विटा येथील कार्यक्रमात एका केलं. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांवरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, तसेच जे नियमित कर्ज भरतात. त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार असल्याचं यावेळी बच्चू कडूंनी सांगितलं. विटा येथे आयोजित नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.