वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याची धमकी; मंदिर विश्वस्तांना आलेल्या पत्रामुळे खळबळ

parli

बीड – ‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन’ अशी धमकी असलेल्या … Read more

मराठवाड्यातील 23 नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले 

औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन … Read more

लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करून केंद्राला चालवायला द्या; खासदार प्रितम मुंडेंचा घणाघात

बीड – महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत सरकारला एकही मुद्द्यावर यश आलेले नाही. प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रितम मुंडे यांनी लगावला. ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

‘आमचं लग्न लावून द्या’ म्हणत प्रेमीयुगुलांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

water tankl

बीड – कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या मागणीसाठी बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. परवानगी दिली तरच खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ माजली. सुमारे 10 तास हा … Read more

मराठवाडा हादरला ! अल्पवयीन मुलीवर तब्बल चारशे जणांनी केला अत्याचार 

crime 2

बीड – काही दिवसांपूर्वी डोंबिवली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप्त व्यक्त केला होता. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना, अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना … Read more

भरती परीक्षेचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच ! एका उमेदवाराला आले तब्बल 34 हॉलतिकीट

बीड – आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. … Read more

बाप- लेकाच्या नात्याला पुन्हा काळिमा ! बापानेच केला पोटच्या मुलाचा खून

Murder

बीड – औरंगाबाद शहरातील प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असताना आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दैठणा येथे अज्ञात व्यतीने एका अडोत्तीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जलदगतीने तपास करून सभ्यतेचा आव आणणाऱ्या मारेकऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली. त्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली … Read more