पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; यानंतर वैतागलेल्या पतीने उचलले ‘हे’ भयानक पाऊल

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड शहरातील गोरे वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपले आयुष्य संपावले आहे. त्याने राहत्या घराजवळील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मृत तरुणाच्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव उल्हास सीताराम पवार असे असून ते बीड शहराजवळील गोरे वस्ती येथील रहिवाशी होते. मृत उल्हास सीताराम पवार यांच्या पत्नीचे गेल्या काही काळापासून घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती उल्हास यांना समजताच त्यांनी आपल्या पत्नीला समाज दिली. मात्र त्यांच्या पत्नीने शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पवार यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला असता मृत तरुणाच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये या तरुणाने आत्महत्येचं कारण लिहिलं असून पत्नीचं घराशेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर अनैतिक संबंध सुरू असल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.