अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी प्रथमच सोडलं मौन

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे अशाही बातम्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच … Read more

राष्ट्रवादी पक्षातून कोणीही फुटणार नाही, लवकरच 16 आमदार निलंबित होणार : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी पक्षातून कोणीही आमदार फुटणार नाही. अफवा वावड्या या कायमच उठत असतात. लवकरच 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आहेत, असा विश्वास आ. शशिकांत … Read more

भाजपला सर्वात मोठा झटका!! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

congress bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी सुदधा भाजपवर नाराज होऊन काँग्रेसचा झेंडा हातात घेतला होता. त्यातच आता शेट्टर यांनीही काँग्रेस प्रवेश … Read more

जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे कारस्थान होते काय? सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकारच्या बेफिकिरीमुळेच पुलवामा हल्ला झाला असा सनसनाटी आरोप तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांच्या फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात. जवानांसाठी का होत नाही? असा सवाल सामनातून करण्यात आला. … Read more

शिंदेंची जागा अजितदादा घेणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी; इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ

ajit pawar shinde fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही मोठ्या दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्ट केव्हाही निकाल देऊ शकत. परंतु तत्पूर्वीच आता एकनाथ शिंदे यांची जागा अजित पवार (Ajit Pawar) घेणार असलयाचे खळबळजनक वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिले … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला पुन्हा अपघात

Jaykumar Gore

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व असून या गाडीत आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते बसले होते. म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप आ. जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या … Read more

रणजितसिंह निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे…; महिलेकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्ही दि. 12 रोजी संगोल्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना जर पाठीशी घातले, … Read more

चंद्रकांत पाटील गोमूत्रधारी, भाजपचा उल्लेख उंदीर; उद्धव ठाकरे तुटून पडले

uddhav thackeray chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशीद पाडली तेव्हा तिथे शिवसैनिक आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नव्हते अस विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील हे गोमूत्रधारी आहेत असं म्हणत त्यांनी भाजपचा उल्लेख उंदीर असा केला. मातोश्री येथील पत्रकार परिषद उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव … Read more

Satara News : एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर त्याला डायरेक्ट शूट ॲट साईट करा : उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते आज पुन्हा एका त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली. समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत भोसलेंसोबत युती का? बाळासाहेब पाटलांनी सांगितलं नेमकं कारण…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितपणे उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसलेंसोबतच्या नेमकी युती कोणत्या उद्देश्याने केली यामागचे कारण आ. पाटलांनी स्पष्ट केले. “आम्हाला ही निवडणूक काय नवीन नाही. आमच्यात काही राजकीय संदर्भ बदलले … Read more