व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरे सर्वात मोठा दलाल, त्यांना फक्त ‘धन की बात’ समजते; राणेंचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे हे सर्वात मोठा दलाल आहेत, त्यांनी महाराष्ट्र पेटवापेटवी करण्यापेक्षा लोकांच्या घरात चुली पेटवा असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. रिफायनरीच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात बोलताना नितेश राणे बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसूमध्ये लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम करून ते पुन्हा मुबंईला जाणार आहेत. उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे त्यांनी सांगावं. सगळा पैसा आदित्य आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा आहे का? कोकणातल्या तरुणांनी पैसे नाही कमवायचे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी केला

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पत्र दिलं होतं. मात्र आता तेच विरोध करताहेत. हा विचार नेमका कसा बदलला. हा विचार कोकणच्या जनतेसाठी नाही, तर खिशात पैसे आले पाहिजे. मातोश्रीवर खोके आले पाहिजे म्हणून बदलला, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी ठाकरेंवर केला आहे.