भारत- कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; सर्व न्यूज चॅनेलला दिल्या ‘या’ सूचना

news channel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणेने कॅनडातील एका दहशतवाद्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर लावला आहे. या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध अत्यंत बिघडले आहेत. मुख्य म्हणजे, या वादात भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या … Read more

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिससाठी जाता येणार थेट ‘या’ देशांमध्ये

doctors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये जाता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने नॅशनल मेडिकल कमिशनला परवानगी दिली आहे. ही परवानगी दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी लागू असेल. ज्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया , कॅनडा या देशांमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल. तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना देखील … Read more

कॅनडात असा साजरा होणार भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा

स्वातंत्र्य दिन विशेष   | अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात उत्तर अमेरिका प्रांतात तर अनेक भारतीय लोक वास्तव्यास आहेत. कोणी कामानिमित्त तर कोणी उद्योग धंद्याकरता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिन मात्र हे लोक दरवर्षी आवर्जुन साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कॅनडातील टोरोन्टो शहरात स्वातंत्र्यदिना निमित्त १५ अाॅगस्ट रोजी … Read more

शिख नेते रिपुदमन यांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या, एअर इंडिया फ्लाईट ब्लास्टप्रकरणात गोवले होते नाव

ripudaman singh malik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये शीख नेते रिपुदमन सिंग मलिक (ripudaman singh malik) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री हि घटना घडली आहे. त्यांची (ripudaman singh malik) नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. दुचाकीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी आधी त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर पुरावा नष्ट … Read more

कॅनडामध्ये आलेल्या SuperCell Stormचा व्हिडिओ आला समोर

SuperCell Storm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडच्या काळात निसर्गाच्या कहराचे (SuperCell Storm) अनेक उदाहरण पाहायला मिळतात. असाच निसर्गाच्या प्रकोपाचा व्हिडीओ (SuperCell Storm) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल. हा व्हिडिओ कॅनडामधला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या वादळामुळे (SuperCell Storm) कॅनडातले संपूर्ण जनजीवन विस्कळीत … Read more

75 वर्षीय आजोबांच्या शीर्षासनाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

Toni Hello

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी होते. मात्र काही लोक याला अपवाद असतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते एकदम फिट असतात. सध्या अशाच एका आजोबाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचा फिटनेस पाहता तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. शीर्षासन करत असलेल्या एका 75 वर्षीय व्यक्तीचा व्हीडिओ सध्या … Read more

कॅनडाच्या नवीन इमिग्रेशन प्लॅनचा भारतीयांना मोठा फायदा, सहजपणे मिळेल नागरिकत्व

नवी दिल्ली । कॅनडामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनडाच्या सरकारने सोमवारी आपला इमिग्रेशन लेव्हल प्लॅन 2022-2024 जाहीर केला. यामध्ये कॅनडाच्या सरकारने इमिग्रेशन टार्गेट वाढवले ​​आहे. कोविड-19 महामारीमुळे अर्थव्यवस्थेतील मंदीवर मात करण्यासाठी आणि कामगारांची तीव्र कमतरता पूर्ण करण्यासाठी असे केले गेले आहे. पुढील तीन वर्षांत सुमारे 13 लाख स्थलांतरितांना आमंत्रित करण्याचा … Read more

निर्मला सीतारामन यांनी घेतली सिंगापूर, कॅनडा, यूकेच्या अर्थमंत्र्यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सिंगापूर, कॅनडा आणि ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतली. आर्थिक, आरोग्य आणि सहकार्य वाढविण्यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. सीतारामन 30-31 ऑक्टोबर रोजी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या आधी G20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रोमला पोहोचल्या. बैठकीच्या प्रसंगी, सीतारामन यांनी ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक, सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स … Read more

कॅनडाला जाणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी, 27 सप्टेंबरपासून सुरू होणार डायरेक्ट फ्लाईट्स

टोरंटो । कॅनडाला जाणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कॅनडाने भारतातून येणाऱ्या डायरेक्ट फ्लाईट्सवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. आता सोमवारपासून (27 सप्टेंबर) भारतीय फ्लाईट्स पुन्हा कॅनडाला जाऊ शकतील. कॅनडाने सुमारे पाच महिन्यांनंतर ही बंदी उठवली आहे. या निर्णयाची घोषणा करताना, ट्रान्सपोर्ट कॅनडाने शनिवारी ट्विट केले, “27 सप्टेंबरपासून 00:01 EDT पर्यंत, भारताकडून येणाऱ्या डायरेक्ट … Read more

ऑगस्टच्या अखेरीस Covaxin ला मिळू शकते आंतरराष्ट्रीय मान्यता, WHO ची आज मोठी बैठक

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनला आंतरराष्ट्रीय स्तरावर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ऑगस्टपर्यंत मान्यता मिळू शकते. WHO चे शिष्टमंडळ आज आरोग्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या EUL मध्ये समाविष्ट होण्यासाठी ही लस फार पूर्वी लागू झाली होती. कॅनडामध्ये कोव्हॅक्सिनचे ‘पुनरावलोकन’ सुरू आहे. भारत बायोटेकने गेल्या जुलैमध्ये कळवले होते की, … Read more