सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलाच्या वावरा नंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलाने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे ३ तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलाला बेशुद्ध केले.

चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या शक्तिनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या एक अस्वल धुमाकूळ घालत आहे.

‘गाव तिथे बियर बार’ घोषणा देत दारुबंदी जिल्ह्यातच उमेदवाराचा प्रचार

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. राज्यात उमेदवारांच्या प्रचार सभांनाही सुरुवात झाली. एकीकडे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पक्षाचे दिग्गज नेते सभा घेत फिरत आहेत, तर दुसरीकडे कुणी सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. निवडणुकीत चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल, याचा काहीही नेम नाही. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातही असंच काहीसं घडलं आहे. इथे अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी अजब शक्कल लढवली आहे. ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं आहे.

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेते पदी निवड

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसने उशिरा का होईना पण आपला विरोधी पक्ष नेता निवडला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. ते या आधी काँग्रेसचे विधी मंडळ उपनेते म्हणून काम पहात होते. राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर या पदी कोणाची निवड होणार याबाबत काँग्रेसने निर्णय घेतला आहे. Senior Congress … Read more

भाजपचा गड ढासळला ; चंद्रपुरात कॉंग्रेसचे बाळू धानूरकर विजयी

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी | भाजपचा जिल्हा आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. मात्र भाजपला या ठिकाणी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर या ठिकाणी पराभूत झाले आहेत. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले आमदार बाळू धानुरकर विजयी झाले आहेत. हंसराज अहिर यांना ४ लाख ०५ हजार ९७७ मते मिळाली … Read more

महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी |काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांनी आपल्याकडे शारीरिक संभोगाची मागणी केल्याचा आरोप ठेवला आहे. राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त … Read more

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

fe a f ac dfce

चंद्रपूर प्रतिनिधी  | सुरज घुमे   घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर परिसरातील अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी अष्टभूजा परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, अल्पयीन मलाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील पोंभूर्णा येथे मजुरीसाठी गेले होते. तर आई शहरात कामानिमित्त आली … Read more

चंद्रपुरात पुन्हा वाघाची दहशत ; एक शेतकरी मृत्यूमुखी

Tiger

चंद्रपूर | ‘अवनी’ वाघीनीच्या हत्येनंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. वाघाची दहशत आणि नागरिकांची सुरक्षितता यावर मधल्या काळात बरिच चर्चा झाली. अशात चंद्रपूर मधे पून्हा एकदा वाघाची दहशत पहायला मिळाली आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतर्याचा मृत्यू झाला आहे. देवराव भिकाजी जीवतोडे (वय ६८) असे मृत्यूमुखी … Read more

बल्लारपूर हे रोजगार निर्मितीचे केंद्र बनवणार – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

चंद्रपूर । सतिश शिंदे चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. बल्लारपूर येथे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या डायमंड कटिंग सेंटरमधील पहिल्या शंभर उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर देण्याचा सोहळा पार पडला. यावेळी … Read more