राजस्थान: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

जयपूर  । सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून बुधवारी सकाळी कथित खत घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीचाही समावेश आहे. अग्रसेन यांची मालकी असणाऱ्या सर्व ठिकाणी छापे … Read more

सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन,पण.. – अशोक गेहलोत

जयपूर । काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर राजकीय संकट अजून कायम आहे. एकीकडे पायलट यांच्यावर अन्याय झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रसारमाध्यांसमोर येऊन आपलं सरकार पडण्यामागे पायलट कसे सक्रिय होते याबाबत सांगत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री … Read more

सचिन पायलटांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई २१जुलैपर्यंत टळली

जयपूर । राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, सचिन पायलट व इतर सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावलेल्या … Read more

‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ

जयपूर । राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे.गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि … Read more

सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार!’ अशोक गेहलोत यांची जहरी टीका

जयपूर । सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखं आहे. अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान पायलट यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता ते … Read more

सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम; सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय पेच अजूनही कायम आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. पायलट यांचे समर्थक … Read more