Saturday, March 25, 2023

सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार!’ अशोक गेहलोत यांची जहरी टीका

- Advertisement -

जयपूर । सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखं आहे. अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे.

दरम्यान पायलट यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता ते भाजपासोबत जातील किंवा नवा पक्ष काढला तरी ते भाजपाला साथ देतील हे त्यांचं ठरलं आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं. हे करताना आम्हाला आनंद नाही झाला नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले आहेत. घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होता. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून त्यात सहभागी आहे,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलटदेखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला.

- Advertisement -

राजस्थानमध्ये नैतृत्व बदलाची भूमिका घेत सचिन पायलट यांनी अखेर गेहलोत सरकारविरोधात बंड पुकारत २५ आमदारांना बाजूला काढलं. गेहलोत सरकारकडे बहुमत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं गेल्यानंतर सत्याला तुम्ही कधीही पराभूत करु शकत नाही असं एका ओळीचं ट्विट सचिन पायलट यांनी केलं. याबाबत अशोक गेहलोत यांन विचारलं असता त्यांनीही सचिन पायलट यांच्यावर टीका केली आहे. सचिन पायलट यांचं धोरण गेल्या ६ महिन्यांपासून आ बैल मुझे मार असं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”