WHO कडून ठाकरे सरकारचं कौतुक! धारावी मॉडेलची घेतली दखल

मुंबई। जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आणि राज्यातही कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. मुंबई शहर देशातील सर्वात मोठे कोरोना हाॅटस्पाॅट बनले आहे. ठाकरे सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासूनच नियोजनबद्ध काम करत आहे. सरकारच्या याच प्रयत्नांना आता मिळत असून धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाला आळा घालण्यात सरकार यशस्वी झाले आहे. यापार्श्वभुमीवर … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन धोरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. लॉकडाउन हेच धोरण ठरवता कसं येईल? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. … Read more

राज्यात दिवसभरात सापडले ६ हजार ३३० नवीन कोरोनाग्रस्त; आत्तापर्यंत १ लाख जण कोरोनामुक्त 

मुंबई । गेले तीन महिने राज्यात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात रोज नव्याने रुग्ण सातत्याने सापडत आहेत. मात्र याबरोबरच राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत कोरोना मुक्तही होत आहेत. राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. आज राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची रुंगणसंख्या एक लाख पार गेली आहे. कोविड … Read more

माझ्या देहावर करा कोरोनालसीची चाचणी; सातारकर तरुणाचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

मेढा प्रतिनिधी । सध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. जगभरात कोरोनावर औषध शोधण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस-रात्र झटत आहेत. कोरोना विषाणूच्या लसीची मानवी चाचणी माझ्या देहावर करावी अशी मागणी  जावली तालुक्यांतील मेढा गावातील नागरीकाने केली आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना  याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. ही मागणी करणाऱ्या नागरिकाचे नाव किसन … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

राज्यात सरकारी कामांसाठी मराठी भाषा वापरा, अन्यथा पगार वाढ होणार नाही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा मराठीचा ध्यास सुरु झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मराठीचा वापर करण्यास सांगितले आहे. हा विभाग खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे मराठी माणूस या विचारधारेचा प्रसार करणारी शिवसेना यापाठीमागे आहे असे म्हंटले जात आहे. राज्य सरकारच्या या सर्क्युलर मध्ये सर्व सरकारी कार्यालये, … Read more

राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सतत सरकारचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. पर्यायाने सरकारवर आरोपांचे सत्र ही सुरूच आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more