भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

उद्धवजी आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई । उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more

पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट … Read more

संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण बनली आहे. त्याबरोबर राज्यातील अफवाचे पीक देखील एक गंभीर विषय बनला आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री गरज पडली तर पुन्हा संचारबंदी जाहीर करावी लागेल असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा विपर्यास करीत काहींनी पुन्हा संचारबंदीच्या अफवा पसरवल्या आहेत.  याबद्दल खुलासा करत अद्याप पुन्हा संचारबंदी जाहीर केलेली नाही असे … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला असता – जितेंद्र जोशी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच महिने राज्यातील कोरोनाची स्थितीचे राजकारण केले जात आहे. रोज नव्याने ठाकरे सरकारवर आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. यासंदर्भात एका वृत्तपत्राच्या ऑनलाईन मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी याला प्रश्न विचारला असता त्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मत मांडले आणि मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला … Read more

ठाकरे सरकारमुळेच मुंबई आज ICU मध्ये – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरे सरकारमुळेच मुंबई आयसीयू मध्ये गेली असल्याचे ट्विट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात सुरु झाल्यापासून हे टीकास्त्र सुरु आहे. सातत्याने ठाकरे सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात तसेच राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याचे राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. … Read more

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

‘हे’ यश शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्‍या प्रत्येकाचे’ – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत ७६.५२ % पसंती त्यांना मिळाली आहे. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे. आयएएनएस आणि सी व्होटर यांनी संयुक्त रित्या हे सर्वेक्षण केले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सर्वांचे आभार मानले … Read more