तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन २४ तासही झालेले नसताना राज्यात सरकार कोण स्थापणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. शिवसेनेसोबत बोलणी फसली तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करावं लागण्याची नवी शक्यता समोर आली आहे. या परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादीच्या थेट तर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेवर दावा करू शकते. भाजप-शिवसेना महायुतीचं एकूण बळ १५९ आमदारांचं आहे तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही अपक्ष मिळून हे संख्याबळ १७० पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार’ हे वक्तव्य ‘विरोधी’ पक्षनेतेपदासाठी होतं का? याची चर्चा रंग धरू लागली आहे.

कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?

खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

नाणार रिफायनरी विरोधी ठिणगी, मुख्यमंत्र्यांनं विरोधात निषेध सभा

रत्नागिरी प्रतिनिधी। नाणार रिफायनरी विरोधातली टप्पा दोनची संघर्षाची ठिणगी आज पुन्हा एकदा पडली. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या जोडीनं मैदानात उतरली आहे. नाणार पंचक्रोशीतल्या तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. ‘याद राखा’ रिफानरी प्रकल्पासाठी गावाच … Read more

कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. रात्री … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस … Read more

‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’; मुख्यमंत्री होण्याबाबत दानवेंची सावध भूमिका

जालना प्रतिनिधी | राजकारणात सरपंच पदापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे विचार करणार असल्याचं म्हणत रावसाहेब दानवे यांनी आपली मुख्यमंत्री पदाबाबत सावध भूमिका घेत सूचक वक्तव्य केले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वाखाली राज्यभर महाजानदेश यात्रा करण्यात आली होती. तेव्हा आगामी निवडणुकीत विजय … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसाठी कॉंग्रेस समोर ठेवला ‘हा’ फॉर्म्युला

अकोला प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत ९ जागी वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निसटत्या पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. त्यामुळे वंचित आघाडीने काँग्रेस आघाडी सोबत आगामी विधानसभा निवडणूक लढावी असे काँग्रेस नेत्यांना वाटते. परंतु अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपली वेगळीच भूमिका मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित … Read more

ईव्हीएम नाही तर जनता विरोधकांना हरवते – फडणवीस

अहमदनगर प्रतिनिधी | आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत असते, असा … Read more