कोरोना वॅक्सिनवर ICMR चे स्पष्टीकरण; तज्ञ म्हणतात २०२१ पर्यंत लस बनने शक्य नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

Mylan ने भारतात आणले कोविड -१९ वरचे औषध; बाजारात किंमत किती असेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रगमेकर Mylan NV ने सोमवारी सांगितले की रेमडेसिवीरचे जेनेरिक वज़र्न लॉन्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोविड -१९ च्या उपचारासाठी गिलियड सायन्सेसने सर्वप्रथम रेमडेसिवीर हे औषध लॉन्च केले होते. या मंजुरीनंतर Mylan NV म्हणाले की, हे औषध भारतात 400 मिलीग्रामच्या कुपीला 4,800 रुपये किंमतीला विकेल. जगभरात कोरोना विषाणूच्या बाबतीत भारत तिसर्‍या … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली तब्बल 1.11 कोटींवर

वृत्तसंस्था । भारतासह जगातील इतर देशातही कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1.11 कोटींवर पोहोचली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे 5.29 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 63.45 लाख लोकांनी कोरोनामुक्त झाले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, चीनच्या वुहान शहरापासून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरात थैमान घालतो … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

EU ने दिली कोरोनाच्या सर्वात प्रभावी औषधास मंजुरी; आता 27 युरोपियन देशांमध्ये वापर सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन कमिशनने शुक्रवारी म्हटले आहे की कोविड -१९ च्या गंभीर रूग्णांसाठी अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीरला मान्यता देण्यात आली आहे. यासह, युरोपियन प्रदेशात कोविड -१९ च्या उपचारांसाठी मंजूर होणारे हे पहिले औषध ठरले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA- युरोपियन मेडिसीन एजन्सी) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी गिलियड सायन्सेस या … Read more

डॉक्टर म्हणत होता कि माझ्यात कोरोनाची लक्षणे; दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीत एक 26 वर्षीय व्यक्ती असे म्हणत राहिला की, त्याच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आहेत, परंतु त्याचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आला आणि अखेर गुरुवारी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो निरोगी होता आणि अचानक त्याला त्रास होऊ लागला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याला ऑक्सिजन देण्यात येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. ही घटना … Read more