लॉकडाऊनमुळे जीव वाचले नाहीत तर जीव गेले, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे खळबळजनक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सर्वांमध्ये भीती निर्माण करत आहे. इटलीमधील त्याचे तांडव बघून हळूहळू अनेक देशांनी संचारबंदी लागू केली. आतापर्यंत जगभरात ५५,०३,४५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ३, ४६, ७७४ मृत्यू झाले आहेत. तर २३,०३,६३१ रुग्ण बरे झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी अजून संचारबंदी आहे. तर काही ठिकाणी हळूहळू नियम शिथिल केले जात … Read more

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ … Read more

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा … Read more

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे ही तर अभिमानाची गोष्ट – डोनाल्ड ट्रम्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच असे म्हटले आहे की,’ अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग होणे हा एक प्रकारचा बहुमानच आहे’. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एक कार्यक्रमात ते म्हणाले, ‘जेव्हा आपण असे म्हणता की,’ आम्ही संसर्गाच्या बाबतीत पुढे आहोत, तेव्हा मला यात हरकत वाटत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की, आम्ही … Read more

वुहानच्या ‘त्या’ लॅबमध्येच कोरोनाचा जन्म झाला? WHO करणार निष्पक्ष तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी कोरोना विषाणूसंदर्भात स्वतंत्र मूल्यमापन करण्यासंदर्भात बहुतेक सदस्य देशांनी केलेल्या आवाहनापुढे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) झुकली आहे. या साथीच्या प्रसारावरुन अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तसेच जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आफ्रिकन ,युरोपियन देश आणि इतर देशांच्या संघटनेने कोविड -१९च्या जागतिक … Read more

साताऱ्यात क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा मुत्यू ; बनीपुरी गावात एकच खळबळ

सातारा प्रतिनिधी l पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ही मृत महिला ही मुंबईवरून आली होती. मुंबईवरून आल्यावर गावातील शाळेत या महिलेला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास … Read more