Saturday, February 4, 2023

लॉकडाऊनमुळे जीव वाचले नाहीत तर जीव गेले, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे खळबळजनक विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सर्वांमध्ये भीती निर्माण करत आहे. इटलीमधील त्याचे तांडव बघून हळूहळू अनेक देशांनी संचारबंदी लागू केली. आतापर्यंत जगभरात ५५,०३,४५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ३, ४६, ७७४ मृत्यू झाले आहेत. तर २३,०३,६३१ रुग्ण बरे झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी अजून संचारबंदी आहे. तर काही ठिकाणी हळूहळू नियम शिथिल केले जात आहेत. अशावेळी २०१३ चे रसायनशास्त्रातले नोबेल विजेते प्रा. मायकल लेविट यांनी संचारबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे विधान केले आहे. प्रा. नील फर्ग्युसन यांनी सुचविलेल्या संचारबंदीच्या मॉडेलमुळे १० ते १२ पट अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हण्टले आहे. जेपी मॉर्गन यांनी दिलेल्या अहवालानुसार “संचारबंदीमुळे साथीला अटकाव बसण्याऐवजी लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला असल्याचा” दावा त्यांनी केला आहे.

ते म्हणतात, संचारबंदीमुळे कुणाचे जीव वाचले नाहीत. याउलट कदाचित जीव गेले आहेत, संचारबंदीमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कदाचित कमी झाले असेल पण कौटुंबिक अत्याचार, घटस्फोट, मद्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आणि आपल्याकडे असेही लोक आहेत ज्यांच्यावर इतर परिस्थितीत उपचार केले गेले नाहीत. लेविट यांना २०१३ मध्ये “जटिल रासायनिक प्रणालीसाठी मल्टिस्केल मॉडेल विकसित केल्याबद्दल” नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांचे असेही म्हणणे आहे की सरकारने लोकांना मास्क लावण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तसेच सामाजिक अलगाव सारख्या इतर उपायांचा शोध लावला पाहिजे. ते असेही म्हणाले की, संचारबंदी काढून टाकल्यानंतर विषाणूची त्याची स्वतःची गतिशीलता असल्याचे सूचित होते. जी बऱ्याचदा संचारबंदीच्या उपायांशी विसंगत असते. याचा प्रत्यय डेन्मार्क मध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. तेथील शाळा, शॉपिग मॉल सुरु केल्यानंतर संक्रमणाचा दर कमी झाल्याचे दिसून आले तर जर्मनी मधील संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर संक्रमण १ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

प्रा. लेविट म्हणाले, “नेते घाबरून गेले , लोक घाबरून गेले त्यामुळे चर्चेचा प्रचंड अभाव दिसून आला. ते साथीचे रोग तज्ञ् नाहीत मात्र चीनमध्ये या संकटाची सुरुवात झाल्यावरच केवळ आकड्यांच्या आधारावर स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी पुढील पर्यायी भविष्यवाणी केली होती. संचारबंदी प्रभावी होऊ शकेल हे मान्य करत असताना ते असेही म्हणतात की, हे सर्व काही मध्ययुगीन काळासारखे सुरु आहेत. साथीचे रोग तज्ञ त्यांच्या दाव्यांची अतिशोयोक्ती करतात. आणि त्यामुळे लोक त्यांचे ऐकण्याची शक्यता असते. ते म्हणाले की त्याच क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ देखील म्हणतात प्रा. फर्ग्युसन यांचे काम सत्यापित करू शकत नाहीत. इतर प्रतिस्पर्धी शास्त्रज्ञांनी काही मॉडेल सुचविले होते, जे भिन्न परिणाम दाखवितात. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.