अखेर मजुरांच्या ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा; घरी जाण्यासाठी केंद्रानं दिली मुभा

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत गरजेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या राज्यातील घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच … Read more

तारांबळ! औरंगाबाद पोलीसांनी पकडलेला आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे. प्रतिबंधित … Read more

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘घरवापसी’साठी राज्यातून ९२ बस रवाना

मुंबई । राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळं अडकलेल्या महाराष्ट्रातील १ हजार ७८० विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून ९२ बस रवाना झाल्या आहेत. आज रात्री या बस कोटा येथे पोहोचतील. राजस्थानच्या दिशेनं रवाना केलेल्या ९२ बसपैकी ७० बस या राज्य परिवहन विभागाच्या असून, उर्वरित बस खासगी आहेत. या बसेस रायगड आणि बीड जिल्ह्यातून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती … Read more

SBI देतेय ४५ मिनिटांत स्वस्तात कर्ज, ६ महिने EMI भरण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन दरम्यान अशी शक्यता आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता भासेल.ही गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आता तुमच्यासाठी आपत्कालीन कर्ज सुरू केले आहे.यासाठी या लॉकडाउन दरम्यान आपल्याला घराबाहेर पडण्याची देखील आवश्यकता नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त ४५ मिनिटांत हे कर्ज मिळेल. ६ महिने ईएमआय देण्याची गरज नाही स्टेट … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ३३२ तर मृत्यूंनी गाठला हजाराचा टप्पा

नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. … Read more

म्हणुन त्या आज्जी विकतायत १ रुपयाला १ इडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील बरेच लोक इतरांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने मदत करण्यात व्यस्त आहेत. त्याच वेळी, पुष्कळ लोक असे आहेत जे या महागाईच्या काळात पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, असेही बरेच लोक आहेत जे पैशाची पर्वा न करता स्वस्तात वस्तू विकण्यात गुंतले आहेत जेणेकरून इतरांना कोणतीही अडचण येऊ नये. कोयंबटूरमध्येही अशीच एक … Read more

१२ ऑगस्ट पर्यंतची बुक झाली ४५ हजार रेल्वे तिकिटे; ३ मे नंतर ट्रेन सुरु होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलपासून तिकिटांचे बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत सुमारे ४५ लाख रिजर्वेशन तिकिटे बुक होती.रेल्वेचे एडव्हान्स रिजर्वेशन पीरियड एआरआरपी १२० दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज कोरोनाची सुमारे १५०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ३०,००० … Read more

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी घोषणा केली की,”कोरोनाविरूद्धची लढाई आम्ही जिंकली आहे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांशी झगडत आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडने घोषित केले आहे की त्यांनी कोरोना संसर्गाविरूद्धची लढाई पूर्णपणे जिंकलेली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी सोमवारी घोषणा केली की, “न्यूझीलंडमध्ये कोणतेही कम्युनिटी ट्रांसमिशन होत नाहीये … आम्ही ही लढाई जिंकली आहे.”त्या पुढे म्हणाल्या की,आता न्यूझीलंडमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाउन कमी करू … Read more

55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत … Read more

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र … Read more