गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

मुंबई, दिल्ली पेक्षा ‘या’ शहरात कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली आणि मुंबई हे भारतातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली राज्ये आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे ही एकट्या मुंबईतून समोर आली आहेत. पण भारतातील दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडले आहे. इतकेच नाही तर अहमदाबादमध्येही शंभर कोरोना प्रकरणातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) … Read more

जळगावात कोरोनाची दहशत सुरूच; रुग्णसंख्येने गाठला 1000 चा टप्पा, आज 44 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व  429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व … Read more

चिंताजनक! देशातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ … Read more

१ महिना व्हेंटीलेटरवर राहूनही ५ महिन्यांच्या एका मुलीची कोरोनावर मात जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असूनही एका ५ महिन्यांच्या बाळाने कोरोनाव्हायरसवर मात केली. डॉक्टर हा एक चमत्कारच मानत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी ५ महिन्यांची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी गेल्या एका महिन्यापासून कोमामध्ये होती असे असूनही ती वाचली गेली. या … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण … Read more

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा … Read more

Lockdown 4.0 | १२ दिवसांत ७० हजार नवीन कोरोनाग्रस्त; १ हजार ६७७ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या ग्राफने आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत, एकाच दिवसात कधीही ७००० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल झालेले नाहीत, मात्र गेल्या २४ तासांत ७,४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. असे नाही की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे फक्त आजच खूप वाढली आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाच्या … Read more