महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी

corona treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत आहे. परंतु याच कोरोना काळात काही खाजगी डॉक्टर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत. यांमुळे आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. खाजगी रुग्णालयांना … Read more

इंग्लंडनंतर आता ‘या’ देशाच्या खेळाडूंची आयपीएलमधून माघार

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पण उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याच्यापूर्वीच बीसीसीआय समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत असे संकेत दिले आहेत. आता … Read more

कोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात रुग्णसंख्या असेल पीक वर…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्येने चार लाखांचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र तज्ञांनी एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की मे महिन्याच्या तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल आणि या काळात देशात 35 ते 40 … Read more

दिलासादायक !! कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असताना आता काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासात प्रथमच कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत आला आहे. देशात मागील 24 तासात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. India reports 3,66,161 … Read more

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 … Read more

देशात कोरोनाचे थैमान सुरूच; मागील 24 तासांत 4 लाखांहुन अधिक कोरोनाबाधित

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशात लसीकरण चालू असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा काही केल्या आटोक्यात येईना. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले काही दिवस … Read more

फक्त गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येईल ; भाजप आमदाराचा अजब दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लसीकरण करून देखील हवा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. याच दरम्यान कोरोनावर फक्त गोमूत्र पिणे हाच एक उपाय आहे असं अजब विधान भाजप आमदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी हा दावा केला असून … Read more

लहान मुले कोरोनाच्या विळख्यात; पुण्यासह ‘या’ शहरांत चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स … Read more

कोरोनाचा हाहाकार सुरूच!! सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार ; मोठा निर्णय घेण्याची शक्यता ?

Uddhav Thkarey

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वा. समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार. pic.twitter.com/Wd4LtHcrQK — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 5, 2021 आजच्या … Read more