माझ्यासाठी सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची; ‘मन कि बात’मधून नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल तातडीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आज ‘मन कि बात’मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ … Read more

लसीकरणात जिल्ह्याची भरारी; काल एका दिवसात विक्रमी लसीकरण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगळ्यावेगळे आदेश काढून लसीकरण वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील गावागावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल दिवसभरात 47 हजार 799 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी राज्यात 31 व्या क्रमांकावर असलेला जिल्हा थेट 18 व्या स्थानी पोहोचल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे … Read more

…तर रिक्षा होणार जप्त; सोमवारपासून होणार कारवाई

औरंगाबाद – कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. तसेच लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बस चालकांनी तिकीट घ्यावे असे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसागणिक नवनवीन आदेश … Read more

आता पेट्रोल पंपावर कारवाई होणार नाही

pp

औरंगाबाद – लस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीत पेट्रोल पंपाच्या विरोधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खंडपीठात दिली. पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 30) ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी लस घेतल्याशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या … Read more

बंधने येताच दहा टक्क्यांनी वाढले ‘लसवंत’

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार 10 टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी … Read more

औरंगाबादेत उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार पेट्रोल- डिझेल

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो लस,नो पेट्रोल’ या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण … Read more

लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! लस घेतली असेल तरच मिळणार दारू

औरंगाबाद – कोरोना लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि … Read more

लस न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणा-या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 25 नोव्हेंबरपासून सुरु … Read more

‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’ चा आदेश मागे घ्या, अन्यथा… 

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात लसीकरण व्हायलाच हवे मात्र प्रशासनाने सक्ती करू नये. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला आलेले अपयश शहरवासीयांच्या माथी थोपवू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत नुकताच काढलेला फतवा पुढील २४ तासात मागे घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकार्‍यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा औरंगाबाद मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने क्रांतीचौक येथील पेट्रोल … Read more