लाॅकडाउन 3.0 : सोने चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून देशात लाॅकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सोन्या-चांदीच्या किंमतींनी आकाशाला स्पर्श केलेला होता.देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ४२,५३३ आहे तर मृतांचा आकडा हा १,३७३ वर पोहोचला आहे.सरकारने सध्या सुरु असलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला ​​आहे. सोमवारी, मेच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सराफा बाजारात … Read more

त्रिपुरा मध्ये BSF च्या २ जवानांना कोरोनाची बाधा; राज्यात फक्त दोन एक्टिव केस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामधील अंबासा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) युनिटमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन जण बरे झाले आहेत. आता केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शिल्लक आहेत. यापूर्वी … Read more

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

कोरोनामुळे लग्न लावायला पंडित मिळेना; महिला पोलिस अधिकार्‍यांनेच लावून दिलं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे.अशा परिस्थितीत अनेक लग्नें पुढे ढकलण्यात आली आहेत. आणि ज्या लोकांना लग्न करायचे आहे अशांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात लॉकडाउन मुले जिथे पंडित मिळाला नाही तिथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अंजली अग्निहोत्रीने पंडितची भूमिका साकारून वधू-वरांसह लग्नाचे विधी पूर्ण केले.ही घटना … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत ४ मे पासून सलून होणार सुरू; पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्याअंतर्गत ३ मे रोजी संपणार असलेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. यासह, गृह मंत्रालयाने देशातील ७३३ जिल्ह्यांच्या आधारे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभाजन केले आहे.अजूनपर्यंत यापैकी कोणत्याही झोनमध्ये सलून आणि नाव्ह्याची दुकाने पुन्हा सुरू करण्याची … Read more

महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र … Read more

इटलीत २ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण, मृतांची संख्या २८ हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे संक्रमित लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.येथील नागरी संरक्षण विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविड -१९ च्या संसर्गाच्या एकूण २ लाख ७ हजार ४२८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २८ हजार २३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या २४ … Read more

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाख पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आतापर्यंत १.१ दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराची लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली.सिन्हुआ म्हणाले की, अमेरिकेत कोविड -१९च्या संसर्गाची संख्या शुक्रवारी संध्याकाळी ०७.४० (स्थानिक वेळेनुसार) ११ लाख ९७ वर पोहचली आहे. ”सिन्हुआ यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरिंग (सीएसएसई) च्या वतीने … Read more

चीन व्हिलन असल्याचे सांगून निवडणुका जिंकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून … Read more