Monday, January 30, 2023

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे नाव आहे.

वसीराजू कृष्णमूर्ती हैदराबादच्या अप्पल पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या रमंतपुरा येथे राहत होते. उप्पल पोलिसांनी सांगितले आहे की, तो बराच काळ दम्याने पीडित होता आणि त्याची तब्येतही ठीक नव्हती.गेल्या काही दिवसांपासून तो कोविड -१९ ने संक्रमित असल्याचा विचार करत नैराश्यात गेला होता.
काही दिवसांपूर्वीच कृष्णमूर्ती यांनी श्वास घेण्यात अडचण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला राजा कोठी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह होती. शनिवारी सकाळी मूर्ती यांनी पुन्हा पोटदुखीची तक्रार केली. जे त्याला वाटले कि कोविड -१९ चे लक्षण आहे.

- Advertisement -

त्याने कुटुंबीयांकडे वेदना होत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी त्याला गांधी रुग्णालयात तपासणीस चलण्यास सांगितले,कारण तेथे कोरोनाच्या चाचणीची खास सुविधा आहे. जेव्हा ते त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तयारीत होते तेव्हा तो चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि बाल्कनीतून उडी मारली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविला आहे.

कोरोना रूग्ण आणि त्याच्या संशयितांमध्ये सतत नैराश्याची भावना दिसून येते आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे.जिथे सोमवारी कोरोना बाधित एका रूग्णाने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील ट्रॉमा वॉर्डमध्ये एका ५० वर्षीय रूग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण त्याच्या बेडवरून उठला आणि खिडकीतून उडी मारली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.