त्रिपुरा मध्ये BSF च्या २ जवानांना कोरोनाची बाधा; राज्यात फक्त दोन एक्टिव केस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामधील अंबासा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) युनिटमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन जण बरे झाले आहेत. आता केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शिल्लक आहेत.

यापूर्वी बिप्लव कुमार देव म्हणाले होते की राज्य सरकार नजीकच्या काळात लॉकडाऊन बंद करण्याचा विचार करीत नाही आहे परंतु टप्प्याटप्प्याने काही निर्बंध शिथिल करण्याच्या पर्यायांवर विचार ते करतील. ते म्हणाले की,३ मे नंतर लगेचच आंतरराज्यीय बस, ट्रेन किंवा विमानसेवा सुरू करणे शक्य नाही.

 

लॉकडाउन हा कोरोना तोडण्याचा एकमेव मार्ग आहे
राज्य सरकारने पुकारलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर देव बुधवारी संध्याकाळी म्हणाले की,’लॉकडाउन बंद करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग आम्हाला सापडला नाहीये कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाची कडी मोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे.असे दिसते आहे की आम्हाला लॉकडाउन सुरूच ठेवावे लागेल मात्र आम्ही काही निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करत आणू.

लोकांना लॉकडाऊन स्वीकारावेच लागेल
देव म्हणाले होते की, “३ मेनंतर आंतरराज्यीय बस, ट्रेन किंवा विमान सेवा पूर्ववत करणे शक्य नाही. लोकांनी लॉकडाउन हे स्वीकारलेच पाहिजे. राज्यातील कोविड -१९ च्या स्थितीविषयी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना जागरूक केले गेले आहे. ते म्हणाले की, ‘कोणत्याही राजकीय पक्षाने’ त्वरित लॉकडाऊन संपवण्याचा आग्रह धरला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like