कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा, सरकार तुमची सोय करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार … Read more

राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

इटलीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांवर; तर युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जीवघेणा करोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजार २३ झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या … Read more

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये ५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा ५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले ३ आणि आजचे … Read more

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडतच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधितांची एकूण संख्या १९३ झाली आहे. ७ रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर … Read more

करोनाच्या लढ्यात रेल्वे सज्ज; ट्रेनमध्येच तयार केले आयसोलेशन वॉर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अगोदरच ताण आहे. त्यामुळं जर कोरोना देशातील ग्रामीण भागात किंवा ज्या भागात रुग्णालयाची संख्या कमी आहे अशा ठिकाणी पसरला तर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारने भारतीय रेल्वेला तयार राहण्यास सांगितलं होत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यासाठी आयसोलेशन वॉर्डची गरज असते. ही गरज … Read more

आता मारुती-सुझुकी बनवणार व्हेंटिलेटर; १० हजार व्हेंटिलेटरचे लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशात व्हेंटिलेटरची कमतरता पाहता भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनविण्याची विनंती केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती-सुझुकीने आता व्हेंटिलेटर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मारुती-सुझुकी व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीमध्ये सरकारला सहाय्य करणार आहे. त्यासाठी मारुतीने AgVa हेल्थकेअर बरोबर काही करार केले … Read more

कोरोना इफेक्ट: कोल्हापूरच्या चंदगडमध्ये खाजगी दवाखान्यांना कुलूप; रुग्णांचे हाल

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सगळेच हवालदिल झालेत. अशा वेळी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य विभाग झटत आहे. पण कोरोनाच्या धास्तीपोटी इतर आजारांवर उपचार करणारे खाजगी डॉक्टर दवाखाने बंद करत असल्याचे समोर आलय. महाराष्ट्रात ही परिस्थिती दिसून आल्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी खाजगी दवाखाने बंद करू नयेत लोकांचे उपचार करणे … Read more

लॉकडाऊनमुळे बाइकवरून धरली गावची वाट मात्र, अपघातात कुटुंबाचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने धस्तावलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली असता शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला असून या दुर्देवी घटनेमुळे शाहूवाडीतील जांबूर या त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्जेराव भीमराव पाटील … Read more