आमच्याकडून राजकारण होणार नाही; तुम्ही विनाकारण केंद्राकडे बोट दाखवू नका- देवेंद्र फडणवीस

मुंबई । । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांना संदर्भात राज्य सरकारला बऱ्याच सूचना केल्या. यावेळी बोलताना फडणवीस यांनी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज उद्धव यांना, म्हणाले बंधू ‘हे’ कराच…

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीत केलेल्या सूचनासंदर्भात … Read more

मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे ‘मास्क’ विनाच

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते मंत्रालयात उपस्थित झाले होते. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या … Read more

कोरोनाचा थेट मंत्रालयावर हल्ला; एका प्रधान सचिवाला कोरोनाची बाधा

मुंबई । मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. मात्र जिथून या उपाययोजनांची सूत्र हलवली जातात त्या मंत्रालयात आता कोरोनानाने शिरकाव केला आहे. मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन … Read more

पोलीस दलावर कोरोनाचा हमला; राज्यातील 531 पोलीस कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीचा मोर्चा सांभाळत असलेल्या योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात पोलीस दलात कोरोनाचा झालेला शिरकाव म्हणजे कोरोनाची लढाई आणखी कठीण होत असल्याचं संकेत आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांनी प्राण गमावले … Read more

दुर्दैवी! यूपीत महिला पोलीस कर्मचारी कोरोनाने दगावली, ४ दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

लखनऊ । देशामध्ये कोरोना विषाणूच्या फैलाव झपाट्याने  होत आहे. कोरोनासोबतच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांपैकी पोलीस कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, या जीवघेण्या कोरोनानाने या पोलीसांवर सुद्धा झडप घातली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात … Read more

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० … Read more

महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रात १५,५२५ … Read more

कोरोनाच्या लढाईत योगदान द्या, अन्यथा..; राज्य सरकारची खासगी डॉक्टरांना नोटीस

मुंबई । राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावमुळे सरकारी आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांना एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु व्हावं असं … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंनी रेल्वे, लष्कर व पोर्ट ट्रस्टला दिली मदतीची साद; केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं राज्य सरकारनं उपचाराच्या सुविधा वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.  त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडं आयसीयू बेड्ससाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्थांनी … Read more