मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं राज्य सरकारनं उपचाराच्या सुविधा वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडं आयसीयू बेड्ससाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्थांनी त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती राज्य सरकारनं केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. तसेच, परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहित धरून राज्य सरकारने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नौदलाकडे त्यांच्या इमारती व जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल.
नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 6, 2020
दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या धर्तीवर राज्य सरकारवतीने मुंबई येथील बीकेसी संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाची काल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे भेट देऊन पाहाणी केली. ”गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि आझम कॅम्पस, पुणे येथील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी.
Preparedness to fight COVID-19 at Medical College, Nagpur and Masjid in Azam Campus, Pune.#WarAgainstVirus pic.twitter.com/u145O04xDZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”