मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना जाणार?? राजेश टोपेंनी सांगितला तज्ज्ञांचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे असेही पवारांनी सांगितलं माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत … Read more

गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील लोकांना आता मिळणार बूस्टर डोस ? यामागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात करोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहीम त्याविरुद्धचे एक मोठे शस्त्र म्हणून चालवली जात आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्याचे कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी, 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रीकॉशनरी डोसच्या नावाखाली लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता … Read more

मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहणार; राजेश टोपे राहणार उपस्थित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा … Read more

तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आज सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट शेअर … Read more

मुंबईहून रेल्वेने जालन्यात, विनामास्क ग्रामस्थांशी चर्चा.. दानवे पॉझिटीव्ह आल्यानं ग्रामस्थ चिंतेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. परंतु कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी दानवे हे मुंबईहुन रेल्वेने जालन्यात आले होते तसेच ग्रामस्थांशी विना मास्क संवाद साधला. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे. कोरोनाची लक्षणे … Read more

खळबळजनक!!! राज्यात दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने कहर केला असून तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून जनतेमध्ये चिंतेच वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लावले असून देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतच चालली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 40,925 नवीन कोरोना रुग्ण सापडले. राज्यात 14,256 … Read more

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे. तर अजून 15 जणांचा अहवाल येणं बाकी आहे. यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण … Read more

देशात दिवसभरात 1 लाख 17 हजार कोरोनाबाधित; ओमायक्रोन रुग्णसंख्या 3 हजारांवर

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनारुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून काल दिवसभरात तब्बल 1 लाख 17 हजार रुग्ण हे कोरोना बाधित आढळले आहेत. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात काल एका दिवसात १ लाख १७ हजार १०० इतके … Read more

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तसेच देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांची आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेल आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढीमुळे लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण … Read more