कोरोनामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू; मोदी खोटं बोलतायत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे देशभरातील मृत्यूंच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून म्हंटल की, मोदीजी ना स्वत: सत्य बोलतात ना कोणाला बोलून देतात. ऑक्सिजनच्या कमरतेमुळे कोणालाही जीव गमवावा लागला नाही हा खोटा दावा ते अजूनही करतात. सरकारच्या कारभारामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, हे मी आधीच सांगितलं आहे. मोदीजी आपलं कर्तव्य पार पाडा आणि मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत द्या.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 558 वर आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment