हिंगणगाव येथे पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |  कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या … Read more

बिहारमध्ये झालेल्या बस-ट्रकच्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l मजुरांच्या अपघातांचे सत्र सुरू असताना त्यात पुन्हा एका अपघाताची भर पडली आहे. बिहारमध्ये असणाऱ्या बागलपूर येथे झालेल्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात अनेक मजूर हे जखमी झाले आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व अपघातात जखमी … Read more

साताऱ्यात क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा मुत्यू ; बनीपुरी गावात एकच खळबळ

सातारा प्रतिनिधी l पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ही मृत महिला ही मुंबईवरून आली होती. मुंबईवरून आल्यावर गावातील शाळेत या महिलेला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास … Read more

औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह ; कोरोनाच्या संशयाने नागरिकांनी केले दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरातील सिडको, एन-६ येथील आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. मात्र कोरोणाच्या भीतीने या रुग्णाकडे बराच वेळ कोणी फिरकल ही नाही. प्रदीप गंगाधर पवार (वय-40) असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून … Read more

आज औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कालरविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मदनी चौक येथील 65 … Read more

चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या … Read more

अमेरिकेत ८० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ८० हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नुकतीच याबाबत माहिती दिली. कोविड -१९ च्या या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ८०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने (सीएसएसई) सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीत … Read more

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे … Read more

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर … Read more