केजरीवाल यांच्या मुलाने केलं पहिल्यांदा मतदान; वडिलांसोबत सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभेच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासमवेत मतदान केलं. केजरीवाल यांनी आई-वडील तसेच आपली पत्नी सुनीता आणि मुलगा पुलकित यांच्याबरोबर मतदान केले. केजरीवाल यांच्या मुलाने या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन … Read more

सपना चौधरी म्हणाली,”कोण केजरीवाल? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मैदानात उतरवलं आहे. गेल्या वर्षी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश होता. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ती भाजपचा प्रचार करत आहे. दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराकरीता प्रचार करत … Read more

भाजपचा प्रचार करणारी सपना चौधरी म्हणाली, कोणाला विजयी करणार?, लोक म्हणाले, केजरीवाल ! पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. प्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरी भाजपचा प्रचार करत आहेत. भाजपचा प्रचार करत असताना सपनाची चांगलीच फजिती झाली. सपना जमलेल्या लोकांना कोणाला विजयी करणार असे विचारत आहेत. जमलेले लोक केजरीवाल असे उत्तर देत आहेत. सपना चौधरीने दोन वेळेस हा प्रश्न केला तरीही उत्तर केजरीवाल … Read more

काही ट्यूबलाईट अशा असतात …पंतप्रधान मोदींनी राहूल गांधींची उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत मोदींना काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.काही ट्यूबलाईट असतात अशा… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीची … Read more

सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा बाप दहशतवादी कसा असेल – हर्षिता केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचार अधिकच रंगात येऊ लागला आहे. आक्रमक भाजप विरुद्ध संयमी केजरीवाल असा सामना सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. भाजपच्या विखारी प्रचाराला उत्तर द्यायला आता केजरीवाल यांचं कुटुंबही मैदानात उतरलं असून सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा माझा बाप दहशतवादी कसा? असा सवाल अरविंद केजरीवाल यांची २४ वर्षीय कन्या हर्षिता केजरीवाल हिने केला आहे.

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आता दहशतवादाचा मुद्दा नव्यानं अवताराला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी याबाबाबतचे विधान केलं आहे. जावडेकर म्हणले कि, ”केजरीवाल तुम्ही एकदम निरागस चेहरा करून विचारत आहात की मी … Read more

दिल्ली विधानसभेसाठी आपच्या ७० उमेदवारांची यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापेक्ष्या कमी अवधी शिल्लक राहिला असताना आम आदमी पक्षाने आपल्या सर्व ७० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पातपारगंज विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवतील. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणीद्वारे निकाल हाती लागतील. शिक्षण, आरोग्य आणि सरकारी सेवा या मुद्य्यांवर आप सरकार ही निवडणूक लढवत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर असून येत्या ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता आहे.