दिल्ली दंगलप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला अटक

नवी दिल्ली । फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. स्पेशल सेलने यापूर्वीही उमर खालिदची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा … Read more

दिल्ली पोलिसांनी उधळला ISISचा कट; एका अतिरेक्याच्या अटकेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री आयएसआयएसचा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत एका अतिरेक्याला अटक केली. अतिरेक्याला अटक करण्यापूर्वी मोठी चकमक झाली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी अतिरेक्याला ताब्यात घेतलं. अबू युसूफ असं या अतिरक्याचं नाव असून, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा … Read more

थरारक !! दिल्लीमध्ये छपाकची पुनरावृत्ती; मद्यधुंध तरुणाचा पत्नीवर ऍसिड हल्ला

दिल्ली । सतत रोजच्या होणाऱ्या भांडणाला वैतागून एका मद्यधुंध तरुणानं आपल्या पत्नी वर ऍसिड हल्ला केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना पुन्हा एकदा छापाक सिनेमाची आठवण झाली. त्या तरुणाने मुलांवर वर सुद्धा ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या ओरडण्याचा आवाजामुळे बाजूचे लोक गोळा झाले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. लगेच या घटनेची माहिती … Read more

पैसेवाल्या उद्योगपतींचे हनी ट्रॅप करायची गॅंग; २ महिलांसह तिघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप टोळीचा खुलासा केला आहे. बड्या उद्योगपतींची शिकार करणाऱ्या या टोळीतील तीन सदस्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोन महिला आहेत. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दिल्लीतील कृष्णानगर पोलिस ठाण्यात गांधी नगरच्या एका व्यावसायिकाविरूद्ध एका 19 वर्षीय … Read more

दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा समावेश दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी अल हिंद रुग्णालयाचे मालक असलेले डॉ. एम. ए अनवर यांच्यावर दंगलीसाठी लोकांना भडकावण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चार्जशीटमध्ये आपलं नाव … Read more

अबब ! हे काय पैशांसाठी कर्जबाजारी उद्योगपतीने दिली स्वतःच्याच हत्येची सुपारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. मात्र पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान हत्या झालेल्या उद्योगपतीने या तिन्ही आरोपींना आपल्याच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. या मृत उद्योगपतीवर गेली अनेक वर्ष कर्जाचा डोंगर … Read more

रेल्वे कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तहेराने विचारले ‘हे’ तीन प्रश्न; भारतीय लष्कराच्या हालचालींवर ठेवत होते पाळत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या या दोन्ही गुप्तहेरांनी भारतीय सैन्याच्या हालचालीशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी रेल्वे भवनात सापळा रचला होता, सध्या रेल्वेच्या या दोन्ही कर्मचार्‍यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांशी कनेक्शन असल्याच्या संबंधात, रेल्वेच्या २ … Read more

भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा डाव; दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली । भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळविण्याचा आयएसआय चा डाव लष्करी तपास यंत्रणांनी आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारा अबिद हुसेन हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला भारतीय तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन चा वापर करण्यास सांगितले होते. म्हणजे तो … Read more

Boys Locker Room | फेक अकाऊंट काढून तरुणीनेच दिली रेप करण्याची आयडिया; करत होती अश्लिल चॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बॉईज लॉकर रूम प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. तपासादरम्यान सायबर सेलने सर्वांना आश्चर्यचकित केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, एका मुलीने ‘सिद्धार्थ’ नावाने बनावट प्रोफाइल बनवून स्नॅपचॅटवर मुलांमध्ये एंट्री केली होती. मुलाच्या चारित्र्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिने हे सर्वकाही केले.हे चॅटिंग केवळ इंस्टाग्रामवरच नव्हे तर स्नॅपचॅटवरही झाले होते. … Read more

BoysLockerRoom : शाळेतल्या मुलांचे अश्लिल चॅट व्हायरल; एका विद्यार्थ्याला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्रामवरील बॉईज लॉकररूमवरील अश्लील चॅटच्या तपासाची स्वत: दखल घेतली आहे.या ग्रुप प्रकरणात एक शालेय विद्यार्थी पकडला गेला आहे.जवळपास सर्व २१ सदस्य ओळखले गेले आहेत.आता या सर्वांची चौकशी केली जाईल.दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्राम चॅट रूमवर दिल्लीतील शाळकरी मुलांवर बलात्काराचा प्रचार करत असल्या संबधीची कारवाई केली … Read more