‘BoysLockerRoom’ नक्की आहे काय? अश्लिल चॅट ट्विटरवर ट्रेंडिंगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉईज लॉकर रूमच्या वादानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असा बहुतेकांचा विश्वास आहे.चला तर मग जाणून घेऊयात बॉईज लॉकर रूम म्हणजे नक्की काय आहे,त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिस तसेच इंस्टाग्रामला नोटीस दिली असून ८ मे पर्यंत यासंबंधी जाब विचारला आहे. … Read more

दिल्लीत केजरीवाल सरकारचा दारुवर ‘कोरोना टॅक्स’!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारूची दुकाने उघडली गेली,पण त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सोमवारी दिल्ली सरकारने दारूवर ‘कोरोना टॅक्स’ लावला.त्यानंतर दिल्लीत दारू महागली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल.सरकारचा हा निर्णय उद्यापासून अंमलात येणार आहे. एमआरपीवर शासनाने ७०% ‘स्पेशल कोरोना … Read more

तबलिगी जमातच्या मौलाना सादसह इतर तबलिगींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली । तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलत तबलिगींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अंतर्गत हेतुपुरस्सर नसलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह १ हजार ८९० जणांवर हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये … Read more

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यातच का आली?- शरद पवार

मुंबई । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटलं. राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावरही … Read more

वडिल लाॅकडाउनचे नियम पाळत नाहीत म्हणुन मुलाची पोलिसांत तक्रार, FIR दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी दिल्लीत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यात लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल ३० वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी वडिलांविरुध्द एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण नोंदविल्यानंतर दिल्ली पोलिस त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण प्रकरण वसंत कुंज क्षेत्रातील आहे.३० वर्षांच्या मुलाने पोलिसांत तक्रार केली की … Read more

करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांनी शाहिनबाग आंदोलकांना जागा खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होत. मात्र, आंदोलकांनी जागा खाली न केल्यानं अखेर … Read more

जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. Delhi: Police personnel near Barakhamba road offer flowers to the locals … Read more

दिल्ली हिंसाचार: सलग ४ दिवस जळत राहिली राजधानी,पोलिसांना आले तब्बल 13,200 कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचार थांबला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जखमी जीटीबी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिस सर्व हिंसा प्रभावित भागावर दक्षतेने नजर ठेवून आहेत. दरम्यान आता भीषण हिंसाचाराच्या संबंधीच्या धक्कादायक कहाण्या आता समोर येत आहेत. हिंसाचाराच्या सुरुवातीपासून सलग ४ दिवसांपर्यंत पोलिसांना पीडितांचे तब्बल … Read more

जेएनयू हल्ल्यातील ‘त्या’ हल्लेखोर तरुणीची ओळख पटली

जेएनयू हल्ल्यामधील व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हल्लेखोर मुलीची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. मुलीचं नाव कोमल शर्मा असून, ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांची ओळख पटली, १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे’

जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.