पूजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करा! प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई । पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ”बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे’, असे नमूद करत या … Read more

विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय- देवेंद्र फडणवीस

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नव्या अध्यक्षासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. अशातच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी साकारला टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय अशी पतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या … Read more

फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची उलटी गिणती सुरू! प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

सोलापूर । राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. मात्र या योजनेत सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या योजनेवरील आक्षेपानंतर ठाकरे सरकारकडून चौकशीचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने राज्य सरकारने चौकशी समिती गठित केली आहे. या चौकशी … Read more

फडणवीसांना ‘त्यासाठी’ माझ्या मनापासून शुभेच्छा! संजय राऊत असं का म्हणाले ?

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला. आणि नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड झाली. यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या लवकरच फासे पलटतील या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत … Read more

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि भाजप युतीचे हे स्पष्ट संकेत तर नाहीत ना अशीही शंका उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन … Read more

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित ; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची … Read more

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी देखील केली अयोध्येला जाण्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी … Read more

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून सत्ताधाऱ्यांची ढोंगबाजी- देवेंद्र फडणवीस

भंडारा । मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी मोर्चा पार पडला. या मोर्चाला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मात्र, या मोर्चावर विधानसभेचे … Read more

‘राज्य सरकारच्या घोळामुळंचं मराठा आरक्षणाची ही स्थिती’; फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. सरकारच्या घोळामुळं मराठा आरक्षणाची ही स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरु होणार होती. मात्र, न्यायालयाचनं सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावरुनच … Read more

हा तर बेशरमपणाचा कळस ; शिवसेनेचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होत असतानाच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर राग व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र … Read more