वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनामुळं एका कार्यक्रमात मनावर दगड ठेवत रबडी, कुल्फीचा मोह टाळला. याबाबतची जाहीर कबुली खुद्द फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ही घटना आहे पिंपरी-चिंचवडमधील.

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”

शिवसेनेनं फडणवीसांना खडसावलं;कोणताही आरोप केला तरी सरकार पडणार नाही!

Devendra Fadanvis

गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांना ट्विटरवरून तर कधी प्रसार माध्यमातून लक्ष करताना दिसत आहे. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर कधी महाविकाघडीतील जयंत पाटील यांच्यावर फडणवीस यांनी ट्विटरवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकारावर आता शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या … Read more

अजित पवार देखील परत येतील – संजय राऊत

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . गेले २८ दिवस शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या. एकीकडे अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रचंड संकटात असताना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना . शुक्रवारी हा तिढा अखेर सुटेल आणि शनिवारी शिवसेनेची तोफ धडाडेल असं महाराष्ट्राला पटवून देण्यात आले होते . आणि शनिवारी जे घडले ते पाहून महाराष्ट्र हादरला . राजकारणात काहीही होऊ शकत हे महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिल …

कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. रात्री … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

नव्या मंत्रिमंडळ विस्तारातही सांगली राहणार वंचित?

  सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार येत्या १४ जून रोजी होण्याची शक्यता असून यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे , तर भाजप-सेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात सांगली जिल्हा मात्र मंत्रिपदापासून वंचित राहतो की काय, अशी परिस्थिती आजही कायम आहे. नव्या विस्तारात सांगलीच्या एकाही आमदाराच्या नावाची चर्चा नाही. सदाभाऊ … Read more