धनंजय मुंडेंची मोठी घोषणा ; ‘या’ दिवशी होणार बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

‘भाऊ म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.. ‘ धनंजय मुंडेंची बहीण पंकजाला भावनिक साद

मुंबई । माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण वाढल्याने पंकजा यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि पंकजा याचे भाऊ धनंजय मुंडेंनी बहीण पंकजाच्या प्रकृतीसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर एक भावनिक ट्विट करत त्यांनी पंकजाला काळजी घेण्यास सांगितलं असून या क्षणी … Read more

तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका ; धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका देखीप फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा … Read more

105 आमदार असलेल्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो यालाच लोकशाही म्हणायचं ; धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीची होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. “64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो … Read more

धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात भरती; ‘हे’ आहे कारण

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द धनंजय मुडेंनी याबाबत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ; दिग्गज नेत्यांच्या बैठकीनंतर एकमताने निर्णय

पुणे । ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला … Read more

‘एकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सारं काही मिटलं असं नाही’- पंकजा मुंडे

पुणे । भाजपच्या नेत्या मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुण्यात एकत्र आले असताना त्यांनी धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिला. जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही. मात्र, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असाही नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. … Read more

‘खडसेंवर झालेल्या अन्यायाला पवार साहेब न्याय देतील’- धनंजय मुंडे

बीड । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया … Read more

श्रेय घेण्यावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा चढाओढ; आता ‘या’ मुद्दयावर रंगला सामना

बीड । राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१ कोटी रुपयांची थकहमी दिली आहे. या ३४ कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर विरोधातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा … Read more

धनंजय मुंडेंनी मुंबईत अनुभवली भयंकर ‘पाऊसकोंडी’, सांगितला थरारक अनुभव..

मुंबई । मुंबईत बुधवारी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसाचा मोठा फटका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बसला. धनंजय मुंडे यांना तब्बल सव्वा तीन तास एका जागी अडकून पडावे लागले. मुंडे हे सकाळी साडेनऊ वाजता परळीहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या बैठकीला त्यांना पोहोचायचं होतं. संध्याकाळी … Read more