शरद पवारांचे राजकारण शुद्ध, त्यांच्यावर कधीही भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले नाहीत ; चंद्रकांत दादांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच राजकारण हे शुध्द राजकारण मानलं जातं.त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. त्यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे आणि त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांना प्रथमत: आवाहन करेल की माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खूप राजकीय जीवन त्यांना जगायला मिळाले. या राजकीय जीवनात मंत्री न राहता नॉर्मल कार्यकर्ता म्हणून काम करायला वाव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंबहुना शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. जर राजीनामा घेतला नाही तर राज्यभर भाजप आंदोलन करेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment