धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ; राष्ट्रवादीकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांनतर राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं आहे

चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला. आरोप तर होतच राहतात. जे आरोप करतात त्यांना तसा अधिकारही आहे. पण विरोधकांनी केलेल्या  आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.  राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणांमधील सत्य बाहेर येईल, शिवाय, याबाबत आपण फार काही बोलू शकणार नाही,’ असेही त्यानं नमूद केलं आहे.

एखादी तक्रार झाली तर त्याची चौकशी होत असते. पण आरोप करणारी महिला त्यांची नातेवाईक आहे. तक्रारदाराच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांनी लग्न केलेले असून, उभयतांना दोन मुलेसुद्धा आहेत. याच्यामागे काय कारण आहे ते चौकशीत सगळे समोर येईल. त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. एखाद्या महिलेसोबत त्यांचे लग्न आधी झालेले आहे, त्यांची मुले आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल. त्यावर फार काही बोलू शकणार नाही,’ असेही नवाब मलिक म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like