अशी झाली दिवाळी या सणाची सुरवात…

Screen Shot at .. AM

#HappyDiwali | दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश … Read more

माझ्यासाठी दिवाळी म्हणजे…!

लहानपणी दिवाळी हा फक्त उत्सव नव्हता, डोक्यावर घमेल्या मधे मती आणणे, किल्ले बनविणे, दिवाळीत नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, दीवाळी उत्सव नव्हता तर भावना होती. पहिला फटका फोडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही त्यावेळी स्पर्धा होती. आपल्या किल्ल्यावर लक्ष्य ठेवणे ते ही शेवटच्या दिवसापर्यंत आणी त्याचे रक्षण करणे ही माझ्यासाठी दिवाळी होती, मला दिवाळीच्या फराळात जास्त रस नव्हता. माझ्या बालेकिल्ल्यात तोफ, धबधबा, एरगन आदी मॉडेल्स वापरण्यासारख्या माझ्या आवडी भिन्न होत्या. मी माझे सर्व अभ्यास शाळेतच पूर्ण करायचो जेणेकरून मी किल्ला बांधण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो, किल्ले बनवताना मी संपूर्ण महिना अगोदर पासून तैयारी करायचो. किल्ल्यांकडे मला बरीच बक्षिसे मिळाली. हे माझे कौशल्य आता बालापासूनच्या तरुणाई पर्यंतचा प्रवासात गमावले आहे.

यंदा दिवाळी फराळात ट्राय करा कुरकुरीत ‘खजुऱ्या’

पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.

प्रादेशिक वेगळेपण जपणारी ‘भारतीय’ दिवाळी

भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक कोसावर येथील संस्कृती,परंपरा,चालीरीती यांत भिन्नता आढळते. त्यात सण उत्सव-साजरे करण्याबाबत विचार करायचा झाला तर त्यात बऱ्याच समान गोष्टीं सोबत वेगळेपण जाणवते. प्रत्येक प्रदेशात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवाळी हा त्यापैकीच एक सण जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेष म्हणजे तो साजरा करण्याच्या कालावधीत सुद्धा प्रदेशवार … Read more

आपण दिवाळी हा सण का साजरा करतो ?

आपल्या भारत वैविध्याने नटलेला देत. भारतात इतकी विविधता जरी असली तरी सगळीकडे या सणाचा एक समान दुवा सापडतो. तो म्हणजे-‘दिवा’,दीप. प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रदेशात घरोघरी दिवे लावून,पणती लावून हा सण आजही साजरा केला जातो. ज्योती-ज्योतीने सारा आसमंत उजळून निघतो. मग दिवाळीत ‘दीपाचं’ महत्त्व काय? जेव्हा या देशात इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट-ट्यूबलाईट नव्हते तेव्हा रात्रीचा अंधार दुर करण्याचं काम हे दिवेच करत होते. वेदांमध्ये म्हटलं आहे ‘तमसो मा ज्योतीर्गमय’-अंधाराकडून प्रकाशाकडे जावे. अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जा हा दिवाळीचा खरा संदेश आहे.तात्पुरता का होईना हे दिवे घरातला अंधार दुर करतात. आजूबाजूला प्रकाश पसरवतात. अशा दिव्याच्या रांगांच्या रांगा लावून अमावस्येच्या रात्री सारा अंधारच नाहीसा व्हावा ही दिवाळीमागची खरी संकल्पना.

दिवाळी म्हणजे नक्की काय रे भाऊ?

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.

मुहूर्त ट्रेडिंग: दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मिळेल मोठी कमाई करण्याची संधी, मोठ्या नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या

नवी दिल्ली । दिवाळीचा दिवस शेअर बाजारासाठी खूप खास असतो. यावेळी बाजार बंद असला तरी या दिवशी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे (Muhurat trading session 2021) आयोजन केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तास ट्रेडिंग होते. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. जर तुम्ही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत … Read more

दिवाळी म्हणजे खरेदीचा सन…

dillihaat

#HappyDiwali | दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली … Read more

वटवाघळांमुळे ‘या’ गावात उडवले जात नाहीत फटाके, वाचा कारण

#HappyDiwali | दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण तामिळनाडूच्या काही गावांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या गावांमध्ये मागच्या काही वर्षांपासून ‘सायलेंट दिवाळी’ साजरी केली जाते. तमिळनाडूतील या गावांत फटाके वाजवले जात नाहीत. फटाके न वाजवण्याचं कारणही तसंच खास आहे. त्रिची जिल्ह्यातील थोप्पुपट्टी आणि सांपट्टी या दोन गावातील लोक दिवाळीच्या वेळी फटाके उडवत नाहीत. याचं … Read more

वॉटरप्रूफ फटाके आणायचे कुठून?? पावसाने फटाका स्टॉलवाले हवालदिल

पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवलेला आहे. दिवाळीच्या सणानिमीत्त ४ पैसे कमावू या विचारात असणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर ऐन दिवाळीत पावसाने संक्रांत आणली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये फटाके विक्रीस ठेवणाऱ्या पुण्यातील फटाका स्टॉलवाल्यांना पाऊस आणि थंडी अशा दोन्ही संकटांचा सामना यानिमित्ताने करावा लागत आहे. डेक्कन परिसरात भिडे पूल ओलांडल्यानंतर ओंकारेश्वर मंदिराजवळ फटाका विक्रेत्यांना दरवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात येते. ही जागा साधारण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आताही पावसाचा जोर असाच राहिला तर फटाका विक्रेत्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.