दिवाळी म्हणजे नक्की काय रे भाऊ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.

दिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णन

धनत्रयोदशी

दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात ही धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.

नरकचतुर्दर्शी 

हा दिवस छोटी दिवाळी म्हणून जाणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात.

दिवाली – लक्ष्मीपूजन

पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असेही म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या आणि बाल्कन्या खुले ठेवले जातात.तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

पाडवा 

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात.ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.

भाऊबीज

दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात. भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो. हा दिवस भाऊ बहिण सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये “टीका” या नावाने ओळखला जातो.

Leave a Comment