ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी … Read more

20 लाख रुपयांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा छळ; हाॅस्पिटल बांधून देण्यासाठी माहेरच्यांवर दबाव

doctor

औरंगाबाद : जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं ‘रुग्णालय बांधण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पैशांसाठी आरोपी पतीसह सासू, सासरे आणि दीर यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं फिर्यादीत केला आहे. … Read more

शहरातील कॅनॉट परिसरात डॉक्टरावर चाकूने हल्ला, हल्लेखोर पसार

Murder

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या कॅनॉट परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉक्टरवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. यामध्ये डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अब्दुल राफे (अंकोसर्जन) असे त्या जखमी डॉक्टरचे नाव आहे. चाकू हल्ल्याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या … Read more

किरकोळ कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकांकडून घाटीतील डॉक्टरांना मारहाण

Ghati hospital

औरंगाबाद – अपघात विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी किरकोळ कारणामुळे एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना काल रात्री साडेदहा वाजता घडली. या घटनेमुळे घाटी रुग्णालयातील सर्व डॉक्टर एकत्र होत काम न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघात विभागाच्या … Read more

VVS Laxman Birthday – जेव्हा डॉक्टर बनला क्रिकेटर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर Very Very Special रेकॉर्ड

नवी दिल्ली । सौरव गांगुलीचे कर्णधारपद, सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडचा संघर्ष आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची खास खेळी ही भारतीय क्रिकेटची दीर्घकाळ ओळख होती. या ‘चौकडी’ने टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. 2001 मध्ये स्टीव्ह वॉ याच्या ऑस्ट्रेलियाचा 16 कसोटींचा अजेय विजयी रथ रोखण्याचा करिष्मा क्वचितच विसरला जाईल. त्यानंतर लक्ष्मणने कोलकात्यात 281 धावांची फॉलोऑन इनिंग खेळली. ज्याने … Read more

खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच प्रसूती, बाळाचा मृत्यू

baby

औरंगाबाद – गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या … Read more

कोरोनातील कंत्राटी डॉक्टरांची मनपाकडून फसवणूक ? ठरलेले वेतन देण्यास नकार

औरंगाबाद – कोरोनाच्या आपत्कालीन काळात स्वतःचा जीव संकटात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची औरंगाबाद महानगरपालिका फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील सहा महिन्यांपासून या डॉक्टरांचे वेतन थकले आहेच. शिवाय करार करताना मनपाने 50 हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्याचे कबूल केले होते, मात्र आता फक्त 30 हजार रुपयांवर या डॉक्टरांची बोळवण मनपाकडून … Read more

कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस महिला डाॅक्टरला रंगेहाथ अटक; 2 वर्षांपासून करत होते व्यवसाय

कराड : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता बोगस डाॅक्टरांच्या घटनाही घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एका महिला बोगस डाॅक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ पकडले आहे. कराड पोलिसांनी सदर बोगस महिला डाॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिस उपनिरिक्षक राजू डांगे यांनी दिली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1921751107984719 … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1 हजार फॅमिली डॉक्टरांशी संवाद

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही केल्या ती कमी होत नसून ती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडूनही सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक मार्गानी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोणकोणत्या आरोग्याबाबतच्या उपाययोजना करता येऊ शकतील? याविषयी मुख्यमंत्री … Read more

डॉक्टरकडून विवाहितेला शरीरसुखाची मागणी; कोरोना सेंटरमधील घटनेने नागरिकांत संताप

Rape

औरंगाबाद । कोरोनाबाधित महिलेला डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हि घटना घडली आहे. सदर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील पदमपुरा येथील … Read more