लॉकडाउन नंतर कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करताय? ३ लाखांच्या आतमध्ये आहेत ‘हे’ ऑप्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या सध्याच्या संकटांच्या वेळी लोक आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळतील किंवा कमी करतील. जे लोक घराबाहेर फिरतात त्यांना आता कोरोनामुळे स्वतःचे वाहन वापरायचे आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होईल, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. सुमारे ७० टक्के लोक अ‍ॅपवर आधारित वाहन सेवा वापरायचे टाळतील. लॉकडाऊन संपल्यानंतर … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बदलीची चर्चा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशात मागील दोन महिन्यांपासून संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कामावर पंतप्रधान मोदी खुश नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीतारामन यांची बदली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. लॉकडाउनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यात … Read more

लॉकडाउन मध्ये शिथिलता येताच सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात स्थानिक सराफा बाजार बंद आहेत, तरीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक अवलंबून आहेत. यामुळेच सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. १५ मे रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत … Read more

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

PM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल तर ‘असा’ करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरीब वर्ग आणि शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार ८ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये २०००-२००० रुपये करून बँक खात्यात ट्रान्सफर केली … Read more

LIC ने ‘या’ स्कीम मध्ये केला बदल; दर महिन्याला मिळणार १० हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची पंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) ही भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) चालवते. ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित ही एक नॉन-लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग स्कीम आहे. अलीकडेच वित्त मंत्रालयाने तिचा कालावधी तीन वर्षांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविला आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक … Read more

१ जून पासून बदलणार इनकम टॅक्सशी निगडित ‘हा’ फॉर्म; काय होणार परिणाम?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नवीन दुरुस्तीसह फॉर्म २६ एएसला अधिसूचित केले आहे. हे आपले वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे. आपल्या पॅन नंबरच्या मदतीने आपण आयकर विभागाच्या वेबसाइटवरून हे काढू शकता. जर आपण आपल्या उत्पन्नावर कर भरला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने / संस्थेने आपल्या उत्पन्नावरील कर वजा केला असेल तर फॉर्म … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more