५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

लडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वधारले

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे. सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा ३९३०० (वस्तू व सेवा कर सहित )आहे. कालच्यापेक्षा हा दर वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर १ हजार ५०३ डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर १७.४७ डॉलर प्रति औंस आहे.

राज्यावर कर्जाचा डोंगर; युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे धुमशान सुरु आहे. मागील पाच वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेकडून राज्यामध्ये कोणकोणती विकास कामे केली याचा दाखला दिला जात आहे,तर विकासकामांच्या नावाखाली सरकारने धूळफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आज दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रसार सुरु होणार आहे. मात्र त्या आधीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

पीएमसी बँकला कायमचे टाळे लागणार?

मुंबई प्रतिनिधी। पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) बँक आर्थिक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह या आदेशनानंतर बँकेला कायमचे टाळे लागण्याची परिस्थिती वेळ आली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला असून, या निर्णयाने खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

अब की बार ‘चांदी’ ५० हजार रुपये पार, तर सोने ४० हजार रुपयां नजीक

टीम, HELLO महाराष्ट्र | स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या भावांनी प्रति १० ग्रॅम ४०,००० रुपयांच्या नजीकची पातळी गाठली आहे. तर सोन्याचेच अनुकरण करत चांदीचा भाव ही प्रति किलो ५०,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. जागतिक तसेच स्थानिक बाजारातील विविध कारणांमुळे सोने व चांदी उच्चांक गाठत असले तरी … Read more

आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर २.१ टक्क्यांवर

टीम, HELLO महाराष्ट्र | देशाचा आर्थिक विकासदर पाच टक्क्यांपर्यंत घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात जुलैमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरणावर आधारित उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व वीजनिर्मिती या आठ क्षेत्रांत गेल्या वर्षी जुलैमध्ये ७.३ टक्के उत्पादनवाढ नोंदविण्यात आली होती. ती यंदाच्या जुलैमध्ये २.१ टक्के इतकीच नोंदवण्यात आली, असे सरकारने सोमवारी … Read more

मारुती सुझुकीने केली ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात

टीम हॅलो महाराष्ट्र | सध्या भारतीय बाजारावर मंदीचे सावट आहे.या मंदीचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा बसला आहे. नुकतेच मारुती-सुझुकीने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री पहिल्यांदाच मंदीचा सामना करत आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव वृत्तवाहिन्यांना माहिती … Read more

सावधान…! बाजारात  बनावट नोटांचा सुळसुळाट

images

मुंबई प्रतिनिधी | बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. लोअर परेल येथे दोन भाजी विक्रेत्यांना हा फटका बसला आहे. बाजारात अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर … Read more