शिंदे गटाकडून बंडाची सुरुवात कधीपासून?? आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

aditya thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ऑपरेशन झालं असतानाच शिंदे गटाकडून बंड करण्याची तयारी सुरू होती असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेळाव्यात त्यांनी शिंदे गटावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, हे बंड नव्हे … Read more

एकनाथ शिंदेंचा मलाही फोन आला होता, आमदार अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

ambadas danve

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असे फूट शिवसेनेत पडली आहे. त्यातच आता शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांनी तळ ठोकला आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहे. यादरम्यान आता औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे (ambadas danve) … Read more

उद्धव ठाकरे V/S एकनाथ शिंदे यांच्यात कोण जिंकणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल LIVE

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही बाजूनी सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर १ ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार पर्यंत दोन्ही बाजूना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. #UPDATE | … Read more

शिंदे गटाचा शिवसेनेवर दावा?? केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के दिले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे … Read more

शिंदे गटातील 16 आमदारांचे भवितव्य काय?? तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला आज होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकेवर आज तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या समोर सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे असेल. शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई … Read more

तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत; एकनाथ शिंदेंची टीका

Eknath Shinde Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही,” असे म्हणत शिंदे यांनी राऊतांवर टीका केली. नवी दिल्लीत आयोजित … Read more

युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत एक तास चर्चा; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला होता. तेव्हा मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. युतीबाबत ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली होती आणि दोघांमध्ये एक तास चर्चा झाली होती,” असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी  केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या … Read more

जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिवसेनेतील 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र त्यांना दिले. खासदारांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले. एकनाथ शिंदे यांनी … Read more

सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना पवार साहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे !

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावर राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ता रविकांत वरपे यांनी कदमांवर निशाणा साधला आहे. “रामदास कदमांचे आदरणीय पवार साहेब व अजित पवार यांच्यावरील शिवसेना फोडीचे आरोप बेछूट आहेत. कदमांकडे दुसरे कारण नसल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. सत्तेसाठी सगळे … Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!! 12 खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

SHIVSENA MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या लोकसभेतील 19 खासदारांपैकी तब्बल 12 खासदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात सामील झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या 12 खासदारांमध्ये कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, राहुल शेवाळे, भावना गवळी, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, संजय … Read more