शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी.. ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठं वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन बरेच दिवस झालं तरी अजून राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू याना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, असे विधान त्यांनी केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा अतिवृष्टी झालेल्या भागात दौरा करणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दौरे करून माहिती घेत आहेत.

इतर राज्यांमध्येही यापूर्वी २-३ महिने मुख्यमंत्र्यांनाच कारभार पाहावा लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राज्य सांभाळण्यास सक्षम आहेत. सध्या राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसला तरी, शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली, वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं म्हणत राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही बच्चू कडू यांनी दिली.