एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेविरोधात बंडखोरी करून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत आघाडी न करता भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदेंच्या या भूमिकेला 39 शिवसेना आमदार आणि … Read more

शिंदे – फडणवीस सरकार 2024 पर्यंत कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. मात्र, शिंदे व फडणवीस यांच्या सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. “2024 पर्यंत शिंदे व फडणवीस सरकार टिकणार नसून ते पडेल आणि निवडणुका लागतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे. … Read more

कॅबिनेटमध्ये ‘शंभूराज’ ओकेच, भाजपमध्ये रस्सीखेच?

सातारा प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट “ओके मध्येच” फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ … Read more

अडीच वर्षांपूर्वी माझा शब्द पाळला असता तर आज सन्मानाने… ; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. आज त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझे आणि अमित शहा यांच्याशी बोलून ठरेल होते कि, भाजप व शिवसेना यांची युती करून अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शिवसेनेचा करावा. … Read more

पृथ्वीराज चव्हाणांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ आशा

Prithviraj Chavan Eknath shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच “सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले यांच्या नंतर मला मुख्यमंत्री पदाची संधी … Read more

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी सुखाने…; संजय राऊतांच्या शुभेच्छा

Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोघांनाही राज्य चालवण्याच्या शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस हे … Read more

खरी शिवसेना ठाकरेंची कि शिंदेंची? शरद पवार म्हणतात….

pawar thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ४० पेक्षा जास्त आमदारांसह बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर आमच्याकडे ५५ मधील ४० आमदार असून आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची?? ठाकरेंची की शिंदेंची ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना केला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण … Read more

एकनाथजी तुम्हीतरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका; राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. pic.twitter.com/l2YHA0L3ad — Raj Thackeray … Read more

रिक्षावाला कसा बनला मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास जाणुन घ्या

Eknath Shinde Biography in Marathi

व्यक्तिवेध । अक्षय पाटील शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपसोबत सत्तास्थापन करून शिंदेंनी (Eknath Shinde) थेट मुख्यमंत्री पद मिळवलं. कडवट शिवसैनिक, कट्टर हिंदुत्ववादी अशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खरी ओळख. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला राजकीय प्रवास … Read more

‘देवेंद्र फडणवीसांनी 105 आमदारांना घरी बसवलयं’, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला खोचक टोला

CHITRA WAGH

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मागच्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर अनेक स्तरातून शिंदेवर (Eknath Shinde) अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे (Eknath … Read more