टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदी जे. के. पाटील

Tembhu-Sayapur-Koregaon Upsa Irrigation Scheme

कराड | टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेची चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवड टेंभू येथे पार पडली. चेअरमनपदी टेंभूचे जयवंत किसन पाटील (जे.के.) तर व्हा. चेअरमनपदी गोवारेचे मानसिंग बाबुराव सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले. चेअरमन, व्हा. चेअरमनपदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी निवडणूक … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदाला 188 तर सदस्यांचे 1 हजार 20 अर्ज

Gram Panchayat Election Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 103 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 589 अर्ज दाखल झाले आहेत. तर आजअखेर सरपंच पदासाठी तब्बल 188 अर्ज, तर सदस्य पदासाठी 1 हजार 20 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र 4 गावात सरंपच पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला … Read more

शिक्षकांच्या जिल्हा बॅंकेत ‘परिवर्तन’ : सत्ताधाऱ्यांना दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्राथमिक शिक्षक सहकारी निवडणुकीत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील व शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, दोंदे गटाचे दीपक भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सभासद परिवर्तन पॅनेलने 17 जागा जिंकत बँकेत परिवर्तन घडवून आणले. तर शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सभासद विकास पॅनेलला केवळ … Read more

मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे संपर्कप्रमुखांना आदेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांसोबत आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत शिवसेना भवनात पार पडलेल्या … Read more

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढककल्या; ‘हे’ आहे कारण

Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस आहे त्या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सध्याची पूरपरिस्थीती व विस्कळीत … Read more

वाई पालिकेत अनेक दिग्गजांचे पत्ते कट : निवडणूक होणार रंगतदार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक 2022 निवडणुक वाई नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग रचना आराखडा व लोकसंख्येनुसार सोडत आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात आल्या. या प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार?; सुप्रिम कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी होणार? त्याबाबतसुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल सुनावणी सुरू असून कोर्टाने निवडणुकीबाबत राज्य सरकारला महत्वाचा आदेश दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीत त्या भागात निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा सवाल करत … Read more

गुवाहाटी पालिका निवडणुकीत भाजपाला 60 पैकी 58 जागा तर काॅंग्रेसला भोपळा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आसाममधील गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सत्ताधारी भाजपने एकूण 60 जागांपैकी तब्बल 52 जागा व मित्रपक्षांने 6 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आली नाही. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. गुवाहाटी नगरपालिकेत भाजपाची सत्ता … Read more

वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात राजारामबापूंचा नातू निवडणूक रिंगणात?

सांगली प्रतिनिधी  | आघाडी धर्मामुळे सांगली लोकसभा व विधानसभेची जागा मित्रपक्षाला जाते. या ठिकाणी सतत राष्ट्रवादी मित्रपक्षाला मदत करते. मात्र येणार्‍या निवडणुकीत सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीला घ्यावी व प्रतिक जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केली. तर महापालिकेची निवडणूक देखील स्वबळावर लढवण्याचा नारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगली … Read more

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक : मोदींनी केली ‘या’ पाच उमेदवारांशी चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. राष्ट्रपतिपदासाठी जुलै महिन्यात, तर ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून यंदा दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी काहींना संधी देण्यात येणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच … Read more