गांजे विकास सेवा सोसायटीवर आमदार शशिकांत शिंदे गटाचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके नुकतीच जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक राजकीय गटांनी बाजी मारली तर काही गटांना पराभव पत्करावा लागला. गांजे विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती अमित (दादा) कदम यांच्या गटाने 11/0 ने दणदणीत विजयी मिळविला. सोसायटी निवडणुकीत विजय झालेल्या … Read more

निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर खोटा गुन्हा : रविंद्र ढोणे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मी माझ्या वाॅर्डाचा लोकप्रतिनिधी आहे. केवळ निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर घाणेरडे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या कामासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत, राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा पूर्ण तपास करावा, माझा न्यायालयन बाबींवर पूर्ण विश्वास असल्याचे नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी सांगितले. सातारा येथे … Read more

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर : पाटणकर गटाचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील खुर्द येथील बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 20 वर्षाच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 12 पैकी 11 जागा जिंकून  सत्तांतर घडविले. पाटण तालु्क्यातील बेलवडे खुर्द विकास सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी … Read more

‘खानापूर नगरपंचायतला लागेल तेवढा निधी देवू’ – विश्वजित कदम

सांगली प्रतिनिधी । आमदार अनिलभाऊ बाबर आणि सुहासनाना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलकडे पुन्हा एकदा खानापूर नगरपंचायतची सत्ता द्या. खानापूरच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी खानापूर नगरपंचायतला उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. खानापूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँगेस – शिवसेना महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत … Read more

‘आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण’ – खासदार संजयकाका पाटील

सांगली प्रतिनिधी । आमचं राजकीय जीवन संघर्षाचे आहे. संघर्ष आम्हाला नवा नाही. कोणाला संपविण्याचा विषय नाही. दोन वर्षात आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. बालिशपणे टोकाला गेले आहेत. लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी बोलले असतील. मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही. असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी युवानेते रोहीत पाटील यांचे नांव न घेता … Read more

‘धन्याला खुश करण्यासाठी पडळकारांची बेताल वक्तव्ये’ : जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील

सांगली प्रतिनिधी । कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष व नेते रोहित पाटील यांच्या पाठीशी आहेत. पक्षातील काही मंडळी विरोधात आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी दिली. तर भाजपचे आ.गोपीचंद पडळकर धन्याला खूश करण्यासाठी बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांनी हत्तीवर भुंकण्यापेक्षा विधायक कामे करावीत, असा टोला देखील पाटील यांनी … Read more

सांगली जिल्ह्यातील तीनही नगरपंचायतीत होणार तिरंगी लढत

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपणार असून त्यानंतर जरी या तिन्ही पंचायतीतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी साधारणपणे या तिन्हीही पंचायतीत निवडणूक तिरंगी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. शासनाने ओबीसींच्या जागेवरील निवडणुका स्थगित केल्यामुळे एकूण 39 जागांसाठी आता 213 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. … Read more

निवडणुकांवर बहिष्कार : गोवारे ग्रामस्थांचा रस्त्यांच्या मागणीसाठी नवा पवित्रा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोवारे गावास जोडणारे रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत गोवारे ग्रामस्थांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान सभेच्या निवडणूकांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज दि. 8 डिसेंबर रोजी प्रातांधिकारी आणि तहसिलदार कार्यालयाला देण्यात आले. नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्विकारले. निवेदनात … Read more

विधान परिषदेच्या उमेदवारीतून रामदास कदमांचा पत्ता कट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा आमदार रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपमुळे ते अडचणीत आले आहेत. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा त्यांना अजून एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी … Read more

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक एकतर्फी होणार; ‘हे’ उमेदवार बिनविरोध

सांगली | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेरच्या क्षणी फसल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत मंगळवारी निश्चित झाली. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेलचे 21 तर भाजपच्यावतीने शेतकरी विकास पॅनेलचे 16 उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीत आघाडीने मातब्बरांना उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले, मात्र भाजपकडून कमकुवत उमेदवार देण्यात आले. त्यामुळे अवघ्या … Read more